ETV Bharat / state

Udayanraje Bhosle criticize Governor: महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल, तर राज्यपालांनी दुसर्‍या राज्यात जावे - उदयनराजे - राज्यपालांनी दुसर्‍या राज्यात जावे

सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल कोश्यारींवर टीका केली आहे. शेकडो हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्मिती झालेल्या महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल तर त्यांनी दुसर्‍या राज्यात जावे, असे उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांना सुनावले ( Udayanraje Bhosle criticized Governor Bhagat Singh Koshyari ) आहे. यासंदर्भात उदयनराजेंनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Udayanraje Governor
उदयनराजेंनी राज्यपालांना सुनावले
author img

By

Published : Aug 2, 2022, 12:52 PM IST

सातारा - वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर चौफेर टीका ( Bhagat Singh Koshyaris controversial statement ) होत आहे. त्यात आला सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील आक्रमक भूमिका घेत कोश्यारींवर तोफ डागली आहे. शेकडो हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्मिती झालेल्या महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल तर त्यांनी दुसर्‍या राज्यात जावे, असे उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांना सुनावले ( Udayanraje Bhosle criticized Governor Bhagat Singh Koshyari ) आहे. यासंदर्भात उदयनराजेंनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले राज्यपाल? - गुजराती आणि राजस्थानी लोकांना मुंबई आणि ठाणे शहरातून हाकलून दिल्यास इथे काहीही शिल्लक राहणार नाही. देशाची आर्थिक राजधानी असल्याचा मुंबईचा टॅगही हिसकावण्यात येईल, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केले होते ( Governor Bhagat Singh Koshyari ) . मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या विधानावरून चोहोबाजूंनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. त्यानंतर राज्यपालांनी माफी मागितली. दरम्यान, छत्रपती शिवरायांचे थेट वंशज तथा राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील आक्रमक भूमिका घेत राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत.

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने देशाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे.
    मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे याच महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. इतकच नाही तर अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून उभारलेल्या महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल तर त्यांनी दुसऱ्या कोणत्याही राज्यांत जावे.

    — Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) July 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यपालांकडून महाराष्ट्राचा अपमान - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वादग्रस्त विधाने करून महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. अशा महाराष्ट्राबद्दल राज्यपालांना तिरस्कार वाटत असेल तर त्यांनी दुसर्‍या कोणत्याही राज्यात जावे ( Governor should move to another state ), असे उदयनराजेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, चोहोबाजुंनी टीकेचा भडीमार होऊ लागल्यानंतर राज्यपालांनी सारवासारव करत माफी मागितली. मुंबई ही महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. यापुढे आपल्याकडून महाराष्ट्र किंवा मराठी व्यक्तीचा अपमान होणार नाही, असे स्पष्टीकरण देखील राज्यपालांनी दिले आहे.

राज्यपालांनी मागितली माफीनामा-काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होते. मुंबई आणि ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी समाज गेल्यास पैसाच राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारींनी केलं होते. त्यांच्या वक्तव्यानंतर सर्वस्तरातून टीका करण्यात येत होती. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी एक निवेदन जारी करत माफी मागितली ( Bhagat Singh Koshyari Apologised For His Mumbai Remark ) आहे. दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.

हेही वाचा - Har Ghar Tiranga : राष्ट्रध्वजाची निर्मिती करणारे पिंगाली वेंकय्या यांचा आज जन्मदिन, जाणून घ्या, त्यांचे योगदान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.