ETV Bharat / state

'जिद्दीने खेळल्यास विजय निश्चित',साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचे प्रतिपादन - 65th state level inter school sports competition satara news

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, 'आपल्या देशातील बऱ्याच खेळाडूंनी अनेक अडचणींवर मात करुन राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल केले आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्पर्धकांनी आपली भावी वाटचाल करावी. राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल करण्याची क्षमता स्पर्धेतील सहभागी खेळाडूंमध्ये आहे. प्रयत्न करत राहा. एक दिवस यश नक्की प्राप्त होईल.'

जिद्दीने खेळल्यास विजय निश्चित
author img

By

Published : Nov 17, 2019, 5:48 PM IST

सातारा - 'राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेतून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धक तयार होत असून, राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल करण्याची संधी आहे. या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी कशाचीही तमा न बाळगता जिद्दीने खेळावे विजय तुमचाच आहे', असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आज 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी क्रीडा ध्वज फडकावून उद्घाटन केले. यावेळी सर्व खेळाडूंनी मान्यवरांना मानवंदना दिली.

हेही वाचा - मोहम्मद शमी आणि मयांक अग्रवालने गाठले कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, 'आपल्या देशातील बऱ्याच खेळाडूंनी अनेक अडचणींवर मात करुन राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल केले आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्पर्धकांनी आपली भावी वाटचाल करावी. राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल करण्याची क्षमता स्पर्धेतील सहभागी खेळाडूंमध्ये आहे. प्रयत्न करत राहा. एक दिवस यश नक्की प्राप्त होईल.'

राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता राज्याचा संघ निवडला जाणार -

प्रास्ताविकात जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी सांगितले,'राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत यजमान कोल्हापूर विभागासह, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, क्रीडापीठ या नऊ विभागातील 2 हजार 106 खेळाडू, संघव्यवस्थापकांचा सहभाग आहे. या क्रीडा स्पर्धेमधून पंजाब येथे होणाऱ्या 65 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याचा प्रातिनिधीक संघ निवडला जाणार आहे.'

या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, क्रीडा उपसंचालक चंद्रकांत साखरे, माजी नगरसेवक तुषार पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, तालुका क्रीडाधिकारी आमसिद्ध सोलनकर, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश चव्हाण, आर. वाय. जाधव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुजीत शेडगे, विक्रांत दाभाडे, आदित्य अहिरे, सातारा जिल्हा ऍथसेटिक्‍स संघटनेचे सचिव संजय वाटेगावकर आदी उपस्थित होते.

Intro:सातारा : राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेतून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धक तयार होत असून, राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल करण्याची संधी आहे. या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी कशाचीही तमा न बाळगता जिद्दीने खेळावे विजय तुमचाच आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले.Body:जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आज 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी क्रीडा ध्वज फडकावून उद्घाटन केले. यावेळी सर्व खेळाडूंनी मान्यवरांना मानवंदना दिली.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, "" आपल्या देशातील बऱ्याच खेळाडूंनी अनेक अडचणींवर मात करुन राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल केले आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठवून स्पर्धकांनी आपली भावी वाटचाल करावी. राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल करण्याची क्षमता स्पर्धेतील सहभागी खेळाडूंमध्ये आहे. प्रयत्न करत रहा एकना एक दिवस यश नक्की प्राप्त होईल."

राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता राज्याचा संघ निवडला जाणार

प्रास्ताविकात जिल्हा क्रीडाधिकारी युवराजन नाईक यांनी सांगितले, ""राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत यजमान कोल्हापूर विभागासह, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, क्रीडापीठ या नऊ विभागातील 2 हजार 106 खेळाडू, संघव्यवस्थापकांचा सहभाग आहे. या क्रीडा स्पर्धेमधून पंजाब येथे होणाऱ्या 65 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याचा प्रातिनिधीक संघ निवडला जाणार आहे.''

कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, क्रीडा उपसंचालक चंद्रकांत साखरे, माजी नगरसेवक तुषार पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, तालुका क्रीडाधिकारी आमसिद्ध सोलनकर, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश चव्हाण, आर. वाय. जाधव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुजीत शेडगे, विक्रांत दाभाडे, आदित्य अहिरे, सातारा जिल्हा ऍथसेटिक्‍स संघटनेचे सचिव संजय वाटेगावकर आदी उपस्थित होते.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.