ETV Bharat / state

गृह विलगीकरणातील मुंबईकर महिलेचा मृत्यू झाल्याने पाचगणीकर हादरले

पाचगणी शहरातील सिद्धार्थनगरमध्ये एक ६४ वर्षीय महिला वरळी, मुंबई येथून प्रवास करून आली होती. तिला प्रशासनाने गृह विलगीकरणात ठेवले होते. या महिलेचा परवा रात्री अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.

होम क्वारंटाईन मुंबईकर महिलेचा मृत्यू झाल्याने पाचगणीकर हादरले

author img

By

Published : May 24, 2020, 10:08 PM IST

सातारा - गृह विलगीकरणातील मुंबईकर महिलेचा मृत्यू झाल्याने पाचगणीकर हादरून गेले होते. या महिलेच्या रिपोर्टची वाट पाहत असताना काल रात्री उशिरा हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या महिलेचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे निष्पन्न होताच शहरात भीतीचे वातावरण पसरले. काल या महिलेच्या संपर्कात आलेल्या ३५ लोकांना प्रशासनाने बेल एअरच्या शाळेत विलगीकरण केले आहे. महिलेच्या संपर्कातील सुमारे ४० लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पाचगणी शहरातील सिद्धार्थनगरमध्ये एक ६४ वर्षीय महिला वरळी, मुंबई येथून प्रवास करून आली होती. तिला प्रशासनाने होम क्वारंटाईन केले होते. या महिलेचा परवा रात्री अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. सर्व प्रशासन सकाळी सिद्धार्थ नगर येथे दाखल झाले. तातडीने या महिलेचा मृतदेह वाई येथे पाठवण्याची व्यवस्था करून मृताच्या घशाचे स्राव पुणे येथे तपासासाठी पाठवण्यात आले. शासकीय नियमाप्रमाणे महिलेवर पाचगणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. काल रात्री उशिरा या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पाचगणीत खळबळ उडाली. निरंक महाबळेश्वर तालुक्यात कोरोनाचा अखेर शिरकाव झाला. लगेच प्रशासनाने हा परिसर सील केला आणि या विभागात संचारबंदी लागू केली. या महिलेच्या नातेवाईक तसेच संपर्कात आलेल्या 30 ते 35 लोकांना बेल ऐअरच्या विलागीकरण कक्षात दाखल केले. आज सकाळी आरोग्य विभागाने येथील ४० लोकांच्या घशाचे स्राव तापसणीसाठी पुण्याला पाठवण्यात आल्याची माहिती पाचगणी प्राथमिक केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. कदम यांनी दिली.

मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी सांगितले की, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पालिकेने सिद्धार्थनगरचा संपूर्ण भागाचे निर्जंतुकीकरण केले आहे. प्रशासनाने ज्या सुचना केल्या आहेत त्यांचे काटेकोर पालन करावे व नागरिकांना घरातच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती पाटील यांनी केली. शासनाच्या सोशल क्वारंटाईन केंद्राच्या कारभारावर नागरिकांनी बोट ठेवले असून नाराजी व्यक्त केली आहे. पांचगणी शहरातील सिद्धार्थ नगर, शाहूनगर, भीमनगर, आंबेडकर नगर, जुना पॉवर हाऊस, शांतीनगर, गावठाण या विभागात लोक दाटीवाटीने राहतात. त्यामुळे बाहेरून पुण्या मुंबईहून आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन करणे शक्य नव्हते. दाटीवाटीची वस्ती असणाऱ्या या ठिकाणांमध्ये लोकांना घर विलगीकरण कक्षात ठेवण्याऐवजी प्रशासनाने निर्मित केलेल्या १०० खाटांच्या सोशल विलागीकरण कक्षात का ठेवले नाही ? हा प्रश्न उपस्थित करून मग हे केंद्र केवळ वाधवान या धनवान लोकांच्या विलगीकरणासाठीच तयार केले होते का? असा प्रश्न समोर येत आहे. ज्यांची सोय नव्हती अशांना तरी या विलगीकरण कक्षात ठेवायला हवे होते, अशी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, आता तालुक्यात कोरोनाने खाते उघडले असून पाचगणीतील व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून पांचगणी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या 40 लोकांच्या रिपोर्टची प्रतीक्षा पांचगणीकरांना लागून राहिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.