सातारा - कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला ( Heavy rainfall in Koyna area ) आहे. तसेच धरणातील पाणीसाठ्याने शंभर टीएमसीचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्वित करून प्रतिसेकंद 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला ( water release from Pytha Power Station ) आहे.
कोयना धरणात 100.95 टीएमसी पाणीसाठा कोयना धरणातील पाणीसाठा 100.95 टीएमसी झाला आहे. सध्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असून प्रतिसेकंद 3076 क्युसेक पाण्याची धरणात आवक होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशार्यामुळे घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे धरणातील आवक देखील वाढेल. ही शक्यता लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृह कार्यान्वित ( Pytha Power Station ) करून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ गेली चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यातच धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीकाठावरील गावांना नदीपात्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला ( 1050 cusec water release ) आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग वाढविला जाऊ शकतो. गेल्या चोवीस तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 51 मिलीमीटर, नवजा येथे 34 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.