ETV Bharat / state

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा - नदीकाठच्या

शुक्रवारी दुपारी एक वाजतापासून कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहे. धरणामधून २० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस
author img

By

Published : Aug 3, 2019, 10:11 AM IST

सातारा - पाटणसह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग आठ दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जलाशयात तब्बल ५८ हजार २१ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. धरणात ८८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजतापासून कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहे. दुपारी १ वाजतापासून धरणामधून २० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातून २ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात शिवाजीसागर जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. पाटणसह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग आठ दिवसांपासून संततधार मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

कोयना नदीकाठावरील गावांना अतिदक्षतेचा इशारा
कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे तसेच वाड्यावस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Intro:सातारा:- पाटणसह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग आठ दिवसांपासून संततधार जोरदार अतिवृष्टी सुरू असून जलाशयात तब्बल ५८ हजार २१क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. धरणात ८८टीएमसी पाणीसाठा झाला असून आज दुपारी एक वाजता कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे दरवाजे उचलले जाणार असून दुपारी १ वाजता धरणातून २० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु होणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.Body:मागील दोन दिवसात धरणातील जलाशय परिचालन सुचीनुसार निर्धारीत जलपातळी राखण्यासाठी कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातून २हजार १००क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात शिवाजीसागर जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. पाटणसह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग आठ दिवसांपासून संततधार मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

(कोयना नदीकाठावरील गावांना अतिदक्षतेचा इशारा
कोयना धरणातून  पाणी सोडण्यात येणार असल्याने धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्यावस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.