ETV Bharat / state

दाभोलकर हत्या प्रकरण : पिस्तूल सापडले ना? मग गुन्हेगारांनाही लवकर शोधा' - Narendra Dabholkar Murder

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली पिस्तूल ठाण्याजवळच्या समुद्री खाडीत सापडल्याचे समोर आले आहे. पिस्तूल सापडले असेल तर, गुन्हेगारांनाही लवकरात लवकर शोधावे, असे हमीद दाभोलकर म्हणाले.

Hamid Dabholkar
हमीद दाभोलकर
author img

By

Published : Mar 5, 2020, 2:59 PM IST

सातारा - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या हत्येतील पिस्तूल सापडल्याची माहिती माध्यमांकडून मिळत आहे. तपास यंत्रणांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याचे, हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

गुन्हेगारांनाही लवकरात लवकर शोधावे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली पिस्तूल ठाण्याजवळच्या समुद्री खाडीत सापडल्याचे समोर आले आहे. पिस्तूल सापडले असेल तर, गुन्हेगारांनाही लवकरात लवकर शोधावे. यामुळे दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे मारेकरी समोर येतील, असेही हमीद दाभोलकर म्हणाले.

हेही वाचा - दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल समुद्रात सापडलं

20 ऑगस्ट 2013 ला पुण्यात डॉ. दोभोलकरांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही हत्या करण्यात आली होती. या चारही हत्यांमध्ये साम्य असल्याचे तपासात समोर आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.