सातारा - अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना ( Gunaratna Sadavarte Appears In Satara Court ) सातारा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य केल्याप्रकरणी १४ एप्रिल रोजी त्यांना सातारा पोलिसांनी मुंबई कारागृहातून ताब्यात ( Satara Police Taken Gunaratna Sadavarte Custody ) घेतले होते. आज त्यांची ४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली.न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
वंदे मातरम् सह घोषणा - गेल्या शुक्रवारी त्यांना सातारा येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकूण अॅड. सदावर्ते यांची चार दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली होती. मुदत संपल्याने आज सायंकाळी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना चार दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आज सकाळी पाेलिस सदावर्तेंना कोठडीतून शहर पोलीस ठाण्याकडे नेत असताना त्यांनी 'वंदे मातरम्, भारत माता की जय, जुल्म कधी जिंकत नसतो" अशा घाेषणा दिल्या होत्या.
आक्षेपार्ह व्यक्तव्या प्रकरणी गुन्हा - मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने अॅड. सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती व सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सातारा पोलिसांत ऑक्टोबर २०२० मध्ये गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी ते सध्या सातारा पोलिसांच्या अटकेत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिलव्हर ओक घरावर 8 एप्रिलला एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत हल्ला केला होता. याप्रकरणी वकील सदावर्ते यांच्यासह ११० आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
हेही वाचा - Jayashree Patil In Sessions Court : जयश्री पाटील यांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव