ETV Bharat / state

Goat Kid Satara : निसर्गाचा चमत्कार! शेळीने दिला दोन तोंडे अन् चार डोळ्यांच्या कोकरास जन्म, पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Mar 26, 2023, 3:50 PM IST

कराड तालुक्यातील वडगाव हवेली गावात एका शेळीने चक्क दोन तोंडे आणि चार डोळ्यांच्या कोकराला (करडू) जन्म दिला आहे. वडगाव हवेली गावातील अधिक महादेव ठावरे या धनगर समाजातील शेळी पालक शेतकर्‍याकडे शेळ्यांचा कळप आहे. त्या कळपातील शेळीने हा जन्म दिला आहे.

Goat Kid Satara
कोकरू
शेळीने जन्म दिलेला कोकराचा व्हिडीओ

सातारा : शेळी पालन करताना नेहमी अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागत असते. प्राणांच्या बाबतीत कधीकधी निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. नेहमी एक, दोन, तीन व अपवादात्मक वेळी चार पिलांना जन्म दिलेल्या शेळीविषयी आपण अनेकदा ऐकले असेल. पण कराड तालुक्यातील वडगाव हवेली गावात निसर्गाचा अनोखा चमत्कार पाहायला मिळत आहे. एका शेळी पालकाच्या कळपातील शेळीने चक्क दोन तोंडे आणि चार डोळ्यांच्या कोकराला (करडू) जन्म दिला आहे. निसर्गाच्या या चमत्काराची सध्या सर्वत्र चर्चा असून नवजात कोकरू पाहण्यासाठी परिसरातून शेतकरी वडगाव हवेली गावात येत आहेत.

मोठ्या प्रमाणात गर्दी : वडगाव हवेली गावातील अधिक महादेव ठावरे या धनगर समाजातील शेळी पालक शेतकर्‍यांकडे शेळ्यांचा कळप आहे. कळपातील एक शेळी गर्भार होती. त्या शेळीने एका कोकराला जन्म दिला. नवजात कोकरू दोन तोंडे आणि चार डोळ्यांचे असल्याचे पाहून शेळी पालकाला आश्चर्याचा धक्का बसला. ही वार्ता वार्‍यासारखी पंचक्रोशीत पसरली. हा चमत्कार पाहण्यासाठी शेतकर्‍यांची वडगाव हवेलीत गर्दी होऊ लागली आहे.

पाळीव प्राण्यांबाबत अनेक चमत्कार : म्हशीच्या पोटी पांढर्‍या शुभ्र वासरासारख्या रेडकाचा जन्म, एकाचवेळी शेळीच्या पोटी चार कोकरांचा जन्म, असे चमत्कार पाळीव प्राण्यांबाबत अनेकदा पाहायला मिळतात. तसाच चमत्कार वडगाव हवेलीत घडला आहे. शेळीपालक शेतकरी अधिकम ठावरे यांचा अनेक दिवसांपासून शेळ्या पालनाचा व्यवसार आहे. ते धनगर समाजातील असून त्यांच्याकडे शेळ्यांचा कळप आहे. मलमुत्रासाठी शेतकर्‍यांच्या मोकळ्या रानात ते शेळ्या बसवतात. त्यांच्या कळपातील एका गर्भार शेळीने नुकताच दोन तोंडाच्या आणि चार डोळ्यांच्या कोकराला जन्म दिला आहे.

ग्रामपंचायत कार्यालयात आणला रेडा : गटाराच्या पाण्याची पाईप लिकेज झाल्यामुळे पाणी साचून दुर्गंधी पसरल्याने लिकेज काढण्याची मागणी एका शेतकर्‍याने वडगाव हवेली ग्रामपंचायतीकडे केली होती. त्याकडे अनेक दिवस दुर्लक्ष केल्यामुळे एक शेतकरी चक्क रेडा घेऊन इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील ग्रामपंचायत कार्यालयात गेला होता. वडगावमधील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. दोन तोंडे आणि चार डोळ्यांच्या कोकराच्या जन्मामुळे वडगाव हवेली गाव पुन्हा चर्चेत आले आहे.

हेही वाचा : Nashik News: आंतरपीक शेतीतून शोधला आर्थिक प्रगतीचा मार्ग; शेतकऱ्याची कलिंगडसह मिरतीतून लाखोंची कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.