ETV Bharat / state

Satara Gelatin Blast : जिलेटीन स्फोटाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन हादरला, जिलेटीनच्या 115 कांड्या जप्त - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन स्फोट

शेतातील विहीर खुदाईसाठी विनापरवाना 25 जिलेटीन कांड्यांचा ( Gelatin Blast For Farm Well ) वापर करून स्फोट केल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा ( Sahyadri tiger project buffer zone ) बफर झोन हादरला आहे. कोयनानगरनजीकच्या चिरंबे गावात शुक्रवारी ( Chirambe Village Blast ) रात्री उशीरा ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना ( Two Arrest In Satara Gelatin Blast ) अटक करण्यात आली आहे.

Gelatin Blast For Farm Well
Gelatin Blast For Farm Well
author img

By

Published : May 7, 2022, 5:22 PM IST

Updated : May 7, 2022, 8:45 PM IST

कराड (सातारा) - शेतातील विहीर खुदाईसाठी विनापरवाना 25 जिलेटीन कांड्यांचा ( Gelatin Blast For Farm Well ) वापर करून स्फोट केल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा ( Sahyadri tiger project buffer zone ) बफर झोन हादरला आहे. कोयनानगरनजीकच्या चिरंबे गावात शुक्रवारी ( Chirambe Village Blast ) रात्री उशीरा ही घटना घडली. या स्फोटामुळे चिरंबे गावाच्या परिसरातील अनेक घरांना तडे गेले आहेत. याप्रकरणी कोयना पोलिासंनी जिलेटीनच्या 115 कांड्या आणि ट्रॅक्टर जप्त करत दोघांना ( Two Arrest In Satara Gelatin Blast ) अटक केली आहे.

जिलेटीन स्फोटकाचा विनापरवाना वापर - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोनमधील चिरंबे गावात शुक्रवारी रात्री उशिरा मोठा स्फोट झाला. यामुळे लोक घरातून बाहेर पळाले. या स्फोटाची कोयना परिसरात चर्चा सुरू झाल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी चिरंबे गावात छापा मारून जिलेटीनच्या 115 कांड्या आणि ट्रॅक्टर जप्त केला. तसेच संतोष अशोक पवार (36) रा. निसरे, ता. पाटण आणि इंद्रनाथ योगी (40) रा. सांगली यांना अटक केली.

साताऱ्यात जिलेटीनचा स्फोट

घरांच्या भिंतीना गेले तडे - कोयनेच्या दक्षिण भागातील चिरंबे गावात अभय थोरात यांच्या मालकीच्या क्षेत्रात विहीर काढण्यात येत आहे. विहीर खुदाईसाठी विनापरवाना स्फोटकांचा वापर करण्यात आला. 25 जिलेटीनच्या कांड्या फोडून शक्तिशाली स्फोट करण्यात आला. या स्फोटामुळे चिरंबे गावासह परिसरातील घरांच्या भिंतीना तडे गेले आहे. स्फोटानंतर लोक घरातून बाहेर पळाले. ग्रामस्थांनी कोयनानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी जिलेटीनच्या आणखी 115 कांड्या पोलिसांना सापडल्या. स्फोटकांचा साठा आणि स्फोट घडविण्यासाठी आणलेला ट्रॅक्टर जप्त करून ट्रॅक्टर चालक संतोष पवार व इंद्रनाथ योगी यांना अटक केली.

हेही वाचा - Nana Patole On Devendra Fadnavis : ओबीसी आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' निर्णयामुळे गेले; नाना पटोले यांचा गौप्यस्फोट

Last Updated : May 7, 2022, 8:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.