ETV Bharat / state

खासदार श्रीनिवास पाटलांच्या प्रयत्नांमुळे घरी परतणार पंजाबमध्ये अडकलेले गलाई कारागीर - latest satara corona news

सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय करणारे महाराष्ट्रातील शेकडो गलाई कारागीर सहकुटुंब पंजाबमधील अमृतसर परिसरात स्थायिक झाले आहेत. परंतु, लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडला आहे.

खासदार श्रीनिवास पाटील, केतन पाटील
खासदार श्रीनिवास पाटील, केतन पाटील
author img

By

Published : May 20, 2020, 4:31 PM IST

कराड (सातारा) - लॉकडाऊनमुळे पंजाबमध्ये (अमृतसर) अडकलेल्या महाराष्ट्रातील गलाई कारागिरांचा आपल्या मायभूमीत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी पंजाबमधील महाराष्ट्रीय आयपीएस अधिकारी डॉ. केतन पाटील यांच्याशी समन्वय साधत केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात गलाई कारागीर कुटुंबासह आपल्या गावी परतणार आहेत.

सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय करणारे महाराष्ट्रातील शेकडो गलाई कारागीर सहकुटुंब पंजाबमधील अमृतसर परिसरात स्थायिक झाले आहेत. परंतु, लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडला आहे. त्यामुळे गलाई कारागिरांच्या कुटुंबांना आर्थिक समस्यांसह इतर अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला सुमारे चारशे कामगार आपल्या कुटुंबासह महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, त्याला यश येत नव्हते. त्यातील काही कारागिरांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी संपर्क साधला.

पाटील यांनी पंजाब पोलीस दलात कार्यरत असलेले आणि मूळचे महाराष्ट्राचे असलेले केतन पाटील यांच्याशी संपर्क साधला. एसटी बसने कामगारांना परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. पंजाबमध्ये अडकलेल्यांपैकी अनेक जण सांगली जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे पाटील यांनी अमृतसर आणि सांगलीच्या आयएएस अधिकार्‍यांशी समन्वय साधत केंद्राकडे पाठपुरावा केला. त्यानंतर रेल्वे खात्याने या नागरिकांसाठी गाडी सोडण्यास मंजुरी दिली आहे. अमृतसर-सांगली आणि अमृतसर-मुंबई, अशा दोन गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकण, मुंबई, सातारा, सांगली आणि उत्तर महाराष्ट्रातील गलाई कामगार लवकरच आपल्या मूळ गावी परतणार आहेत.

पंजाबमध्ये अडकलेले गलाई व्यवसायिक येत्या दोन- तीन दिवसात आपल्या मायभूमीत परततील. रेल्वेच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना महाराष्ट्रात परत आणण्याची व्यवस्था केंद्र सरकारने केली आहे, असे पाटील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.