सातारा - सातारा लोकसभा मतदार संघातील रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 17 कोटी 28 लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे. याबाबतची माहिती श्रीनिवास पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
खा. श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा मतदार संघातील महत्वाचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अर्थराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामध्ये रस्त्यांची कामे, रुंदीकरण, लहान पुलांच्या कामांचा समावेश होता. या कामांसाठी अर्थसंकल्पात 17 कोटी 28 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण विधानसभा मतदार संघासह खंडाळा तालुक्यातील कामांचा यामध्ये समावेश आहे. केंद्रीय निधीबरोबरच राज्याच्या अर्थसंकल्पातूनही अनेक कामांना अर्थिक तरतूद झाल्यामुळे सातारा लोकसभा मतदार संघातील विकासाला गती येणार असल्याचे खा. श्रीनिवास पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज : रोमहर्षक सामन्यात इंग्लंडची भारतावर मात