ETV Bharat / state

Accident Satara : जिल्ह्यात अपघातांची मालिका; तीन अपघातात ४ ठार, १० जखमी

author img

By

Published : Jun 6, 2022, 9:28 PM IST

पुणे-बंगळुरू महामार्गावर ( Pune-Bangalore Highway ) कराडजवळ २२ प्रवशांना घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स ( 8 injured in Travels accident ) पलटी होऊन ८ जण जखमी झाले आहेत. खंडाळा हद्दीतील 'एस' कॉर्नरवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकचा अपघात होऊन दोन जण जागीच ठार ( Two killed in truck accident ) झाले.

अपघात
अपघात

सातारा - जिल्ह्यात रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी झालेल्या अपघाताच्या तीन घटनांमध्ये ४ जण ठार तर १० जण जखमी झाले आहेत. पुणे-बंगळुरू महामार्गावर ( Pune-Bangalore Highway ) कराडजवळ २२ प्रवशांना घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स ( 8 injured in Travels accident ) पलटी होऊन ८ जण जखमी झाले आहेत. खंडाळा हद्दीतील 'एस' कॉर्नरवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकचा अपघात होऊन दोन जण जागीच ठार ( Two killed in truck accident ) झाले, तर रविवारी रात्री उशीरा महाबळेश्वर रस्त्यावर दोन दुचाकींच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत.

'एस' कॉर्नरवर माल ट्रकच्या अपघातात 2 ठार : स्टील घेऊन पुण्याकडे निघालेल्या मालट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने खंडाळा येथील 'एस' कॉर्नरवर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. चालक सुरज हैदर शेख (वय २४, रा. वेळेगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) आणि विष्णू गोपाळ सुरनर (वय २२) हे मालट्रकखाली सापडून जागीच ठार झाले. अपघातामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहचले. अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

कराडजवळ ट्रॅव्हल्स पलटी, ८ जखमी : सोमवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास मुंबईहून 22 प्रवाशांना घेऊन कोल्हापूरला निघालेली ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत महामार्गाच्या डिव्हायडरला धडकून पलटी झाली. पलटी झाल्यानंतर पंधरा ते वीस फूट अंतर फरफरट गेली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील 8 जण किरकोळ जखमी झाले. त्यांना हायवे अ‍ॅम्ब्युलन्सने कराडमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले.

महाबळेश्वर रस्त्यावर दुचाकींच्या धडकेत दोघे ठार : महाड-महाबळेश्वर मार्गावर हॉटेल अप्सरासमोर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोघे जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 5) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. जुबेर मुस्तफा मानकर (रा. महाबळेश्वर) आणि आकाश तानाजी भोसले (रा. मंगळवेढा, सोलापूर) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

हेही वाचा - सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी पुणे कनेक्शन, दोन संशयित पुण्याचे असल्याचा अंदाज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.