कराड (सातारा) - कृषी कायद्यांविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कराड येथील कोल्हापूर नाक्यावर कॉंग्रेसतर्फे 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. यावेळी कराड शहर पोलिसांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
आंदोलकांनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला -
कृषी कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी कॉंग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात येत होते. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनीही सहभाग घेतला होता. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच आंदोलकांनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कराड शहर पोलिसांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या सत्वशीला चव्हाण यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
हेही वाचा - माघवारी निमित्ताने पंढरपुरात दोन दिवस संचार बंदी? वारकऱ्यांना न येण्याचे आवाहन