ETV Bharat / state

पाटणमधून पळविलेल्या जीपला कराडजवळ अपघात; परदेशी तरूणीचा सिनेस्टाईल थरार

author img

By

Published : Dec 7, 2020, 12:05 PM IST

पाटण तालुक्यातील निसरे येथे उभी असलेली जीप सुरू करून विदेशी तरूणी कराडकडे येत होती. कराडजवळ आल्यानंतर जीपने वॅगनर कारला पाठीमागून धडक दिली आणि जीप पलटी झाली. याप्रकरणी तरुणीवर पोलिसांनी अपघाताच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे.

foreign-girl made and accident in karad satara
अपघात

कराड (सातारा) - पर्यटनासाठी भारतात आलेल्या एका परदेशी तरूणीच्या कारनाम्यामुळे काल (रविवारी) कराड-पाटण मार्गावर सिनेस्टाईल थरार पहायला मिळाला. पाटण तालुक्यातील निसरे येथे उभी असलेली जीप सुरू करून तरूणी भरधाव कराडकडे येत होती. कराडजवळ आल्यानंतर जीपने वॅगनर कारला पाठीमागून धडक दिली आणि जीप पलटी झाली. सुमारे 18 कि. मी. अंतरादरम्यानचा हा सिनेस्टाईल थरार अखेर अपघातानंतर थांबला. पावलिना कोरोनालिया जेसीजे (नेदरलँड), असे परदेशी तरूणीचे नाव असून तिच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद झाला आहे.

नागरिक आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार परदेशी तरूणीने म्हावशी (ता. पाटण) येथील सुस्वाद हॉटेलमध्ये जेवण केले. तेथील चारचाकी गाडी घेऊन पसार होण्याचा तिने प्रयत्न केला. परंतु, गाडीचा मालक हॉटेलमध्ये असल्याने तो बेत फसला. नंतर ती निसरे येथे आली. त्या ठिकाणी एक जीप (क्र. एम. एच. 13 एन. 549) उभी होती. किल्लीही गाडीच्या स्वीचला होती. ती तरूणी थेट गाडीत बसली आणि गाडी स्टार्ट करून ती कराड बाजूकडे भरधाव आली. रस्त्यात अनेक वाहनांना तिने हुलकावण्या दिल्या. सुमारे 18 कि. मी. अंतरादरम्यानचा हा थरार अखेर कराडजवळच्या मुंढे गावच्या हद्दीत जीपला झालेल्या अपघातामुळे थांबला.

कराड-पाटण मार्गावर असणार्‍या कराड आरटीओ कार्यालयापासून काही अंतर पुढे आल्यानंतर मुंढे-एमएसईबीजवळ तरूणीने पळवून आणलेल्या जीपचा अपघात झाला. जीपने वॅगनर कारला (क्र. एम. एच. 50 ए. 7205) पाठीमागून धडक दिली आणि जीप पलटी झाली. सुदैवाने त्या तरूणीला इजा झाली नाही. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. दरम्यान, परदेशी तरूणीने जीप पळवून आणली असून त्या जीपचा अपघात झाल्याची माहिती नागरीकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना दिली. त्यांनी तातडीने पोलीस कर्मचारी घटनास्थळी पाठविले आणि परदेशी तरूणीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी रविवारी रात्री उशीरा पावलिना कोरोनालिया जेसीजे हिच्यावर अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला.

जीप मालकाशी मल्हारपेठ (ता. पाटण) येथील पोलिसांनी संपर्क साधला. परंतु, जीप सापडल्याने त्यांनी परदेशी तरूणीविरोधात तक्रार करणार नसल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान, परदेशी तरूणी कोणत्या तरी नशेच्या अंमलात होती. त्यामुळे तिने मद्य प्राशन केले होते की अंमली पदार्थाचे सेवन केले होते, याबाबतची खात्रीशीर माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

हेही वाचा - दिल्लीमध्ये पाच दहशतवादी ताब्यात; स्पेशल सेलची कारवाई..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.