सातारा : शहरात दोन ठिकाणी झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झालेत. आज सकाळी पुणे-बंगळुरू महामार्गावर बोलेरो पिकअप आणि टवेरा कारचा अपघात झाला. यात 3 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झालेत. अपघाताची दुसरी घटना शुक्रवारी रात्री कोयनानगरजवळ घडली. येथे आयशर टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत 2 तरुणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.
टवेराची पिकअपला धडक : पुणे-बंगळुरू महामार्गावरील हुंडाई शोरूमसमोर टवेरा कारनं बोलेरो पिकअपला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात टवेरा कारमधील 3 जण जागीच ठार झाले, तर 4 जण गंभीर जखमी झालेत. निखिल शशिकांत चौखंडे, प्रियांका निखिल चौखंडे, शशिकांत यदुनाथ चौखंडे, अशी मृतांची नावे आहेत. अपघातात जखमी झालेल्यांची नावे समजू शकलेली असून त्यांना तातडीने सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातानंतर महामार्गावर वाहनांची गर्दी झाली होती.
रक्षा विसर्जनसाठी जाताना अपघात : अपघातातील मृत आणि जखमी व्यक्ती हे जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील असल्याचं सांगितलं जातंय. मृत नातेवाईकाच्या रक्षा विसर्जन विधीसाठी ते साताऱ्याला आले होते. प्राथमिक माहितीनुसार, महामार्गावर कारचा टायर फुटल्यानं हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी दोन्ही वाहनांमधील व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केलं. जखमींमधील एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
टेम्पो-दुचाकीची समोरा-समोर धडक: कोयना नगरजवळ शुक्रवारी रात्री आयशर-दुचाकीची समोरा-समोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील 2 तरुण जागीच ठार झाले तर एक तरुण गंभीर जखमी झालाय. धीरज बनसोडे (वय 18, मूळ रा. नाशिक, सध्या रा. कोयनानगर) , प्रणय कांबळे(रा. हुंबरळी), आनंदा कदम (वय 23, रा. तोरणे) ,अशी मृत तरुणांची नावे आहेत. दुचाकी चालक प्रसाद कदम हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोयना परिसरावर शोककळा : अपघातात मृत झालेले तिघेजण दुचाकीवरुन कोयना नगरकडे निघाले होते. गोषटवाडी गावच्या हद्दीतील एका धोकादायक वळणावर आयशर टेम्पो आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. धडकेमुळे हे तिघे रस्त्यावर पडले. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवणारा प्रसाद कदम हा गंभीर जखमी झाला. तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याने कोयना परिसरावर शोककळा पसरलीय.
हेही वाचा-