सातारा - साताऱ्यात पहिला कोरोना संशयित रुग्ण आढळून आला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचे नमूने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत.
हा ३० वर्षीय तरुण अबुधाबीवरून आलेला आहे. त्याला सर्दी, खोकला छातीत दुखू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संशयिताचे नमूने पुण्यातील एन.आय.व्हीकडे तपासणीसाठी पाठवले गेले असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - वाईत कुटुंबाची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूला बेड्या
हेही वाचा - कोरोनाचे शिंगणापूर यात्रेवर सावट; यात्रा रद्द करण्याचे प्रशासनाचे आदेश