सातारा : वनवा लावण्यास कारणीभूत झाल्याप्रकरणी रेनावळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षिकेला प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा वाई न्यायालयाने सुनावली. शिवाजी लक्ष्मण पार्टे (वेलंग ता.वाई) व नलिनी गणेश खरात (शिरगाव ता. वाई) अशी आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे
वन अधिनियमानुसार कारवाई
या आगीत वनक्षेत्रातील 22 हेक्टर वनक्षेत्र जळून शासनाचे 11 हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी वन अधिनियम 1927 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वनपाल भाऊसाहेब कदम व प्रभारी वनपाल रत्नकांत शिंदे यांनी केला. आरोपींविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले होते.
आरोपींनी भरला दंड
गुन्ह्यातील दोन्ही संशयितांनी वाईचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर. माळी यांच्यासमोर गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 20 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. आरोपींनी एकूण 10 हजार रुपये दंड न्यायालयात भरला. सरकारच्यावतीने सरकारी अभियोक्ता यांनी काम पाहिले.
हेही वाचा- दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच.. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास अधिकचा वेळ