ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यातील ६५४ ग्रामपंचायतींमध्ये लढती ; १२३ ग्रामपंचायती बिनविरोध - 123 Gram Panchayats in Satara District without any objection

सातारा जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायतींंमध्ये लढती होणार आहेत.आता पर्यंत 123 ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत.

Fight in 654 gram panchayats in Satara district
सातारा जिल्ह्यातील ६५४ ग्रामपंचायतींमध्ये लढती ; १२३ ग्रामपंचायती बिनविरोध
author img

By

Published : Jan 6, 2021, 5:32 PM IST

Updated : Jan 6, 2021, 6:06 PM IST

सातारा - जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींमध्ये २ हजार ८१३ वार्डमधून ७ हजार २६६ उमेदवार निवडून देण्यासाठी १७ हजार ६५६ जणांनी अर्ज दाखल केले होते. छाननीच्या दिवशी यातील केवळ २५२ अर्ज बाद झाले. १२३ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर अंशतः ९८ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. जिल्ह्यात २ हजार ६३१ उमेदवार बिनविरोध निवडले गेले असून ६५४ ग्रामपंचायतींमध्ये ९ हजार ५२१ उमेवारांमध्ये निवडणूक रंगणार आहे.

सातारा जिल्ह्यातील ६५४ ग्रामपंचायतींमध्ये लढती ; १२३ ग्रामपंचायती बिनविरोध

साताऱ्यात ९० ग्रामपंचायतींसाठी मतदान -

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक फिवर सुरू आहे. सोमवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत संपली. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले. सातारा तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून, २१ ग्रामपंचायत बिनविरोध तर १७ ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. कराड तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून, १७ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. पाटण तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून,१८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. १७ ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झालेल्या आहेत. कोरेगाव तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून, ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, चार ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध झाल्या आहेत.

वाई तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून, ९ ग्रामपंचायती बिनविरोध तर १० ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत.

फलटणला ७४ ग्रामपंचायतींसाठी मतदान -

खंडाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार असून ६ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत तर १ ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध होणार आहे. महाबळेश्वर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, १९ ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. फलटण तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

जावळीत १२ ग्रामपंचायती बिनविरोध -

जावली तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर २५ ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. माण तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून १३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर १ ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध झाली आहे. खटाव तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून ९ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर ४ अंशतः बिनविरोध झाल्या आहेत.

Last Updated : Jan 6, 2021, 6:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.