ETV Bharat / state

दुष्काळाने तारले अन् बाजारभावाने मारले..! दुष्काळी पट्ट्यातील उत्पादक शेतकर्‍यांची व्यथा

author img

By

Published : Mar 11, 2020, 6:18 PM IST

Updated : Mar 11, 2020, 6:40 PM IST

शेतात सोन्यासारखी पिके उभी राहिली. लाखो रुपये भाडंवल शेतीत गुंतवल्याने पिके बहरून गेली. पीक काढणीसाठी आले आणि शेतीमालाचे दर कोसळले. भाजीपाल्यासह इतर पिकांचे दर गडगडल्याने शेतकरी वर्ग पुन्हा अडचणीत आला आहे. त्यामुळे यावर्षी दुष्काळाने तारले अन् बाजारभावाने मारले, अशी अवस्था सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होऊन बसली आहे.

less crop price
दुष्काळी पट्ट्यातील उत्पादक शेतकर्‍यांची अवस्था

सातारा - जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात यावर्षी चांगला पाऊस पडल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. ओढे , नाले, बंधारे, तलाव विहिरी भरून वाहू लागल्याने पिकांना मुबलक पाणी मिळाले. शेतकर्‍याने काबाडकष्ट करून कर्ज काढून पिके उभी केली. त्यामुळे शेतात सोन्यासारखी पिके उभी राहिली. लाखो रुपये भाडंवल शेतीत गुंतवल्याने पिके बहरून गेली. पीक काढणीसाठी आले आणि शेतीमालाचे दर कोसळले. भाजीपाल्यासह इतर पिकांचे दर गडगडल्याने शेतकरी वर्ग पुन्हा अडचणीत आला आहे. त्यामुळे यावर्षी दुष्काळाने तारले अन् बाजारभावाने मारले, अशी अवस्था शेतकऱ्यांची होऊन बसली आहे.

दुष्काळाने तारले अन् बाजारभावाने मारले..! दुष्काळी पट्ट्यातील उत्पादक शेतकर्‍यांची अवस्था

जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांबरोबरच टोमॅटो, मेथी, शेपू, पालक, कोंथिबीर, गवार, यासारखी नगदी पिके घेतली आहेत. ही पिके काढणीसाठी आली असून नेमकी आता ती पिके कवडीमोल भावात विकण्याची वेळ येथील शेतकरी वर्गावर आली आहे. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.

दुष्काळी पट्ट्यातील कायम कोरडी ठणठणीत असणाऱ्या येरळा, माण, बाणगंगा नद्या यंदा दुथडी भरून वाहत होत्या. अनेक बंधारे ओसंडून वाहत होते. यंदा वरुणराजांची दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर मोठी कृपा झाली. बोरवेल, विहिरी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे अनेक ठिकाणच्या विहिरींचा तळ देखील दिसत नाही. इतके मुबलक पाणी आहे. गेली चार-पाच वर्ष दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी होरपळून निघाला होता. यंदा शेतकर्‍याने काळ्या मातीत सोने पिकवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. सध्या शेतीमालाच्या कोसळलेल्या भावात पिकांचा खर्च सुद्धा वसूल होत नाही. त्यामुळे अस्मानी संकटातून वाचलेला शेतकरी सुलतानी संकटात सापडला आहे. दरवर्षी सारखेच उत्पन्न, खर्चही जास्त होते. मात्र, पिकांना कवडीमोल भाव मिळतो. त्यामुळे येथील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

यंदा मुबलक पाणी असल्याने शेतीमधून नफा मिळेल. त्यामुळे डोक्यावर असलेले कर्ज थोडेफार कमी होईल. मुलीचे लग्न होईल. मुलांना चांगले शिक्षण देता येईल, अशी आशा उराशी बाळगून असलेल्या शेतकर्‍याचे स्वप्न मातीमोल झाले आहे. या भागात मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणीटंचाई निर्माण होत असते. त्यामुळे पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही. यावेळी आपला उदरनिर्वाह चालावा, मुलांसाठी लागणारा खर्च निघावा, यासाठी शेतकरी १०-१२ गुंठे भाजीपाल्याची शेती करतात. उन्हाळ्यात बाजारभाव मिळून ४ पैसे मिळतील, अशी अपेक्षा असते. मुबलक उत्पादन मिळाले नाही तरी किमान कुटुंबाची खर्च चालवावा, असे शेतकऱ्याला वाटते. मात्र, शेतीमाल कवडीमोल भावात विकला जात असल्याने उन्हाळ्यात पिकांसाठी केलेला खर्च देखील वसूल होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Last Updated : Mar 11, 2020, 6:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.