ETV Bharat / state

साताऱ्यात पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर; प्रशासनाचे दुर्लक्ष

शासनाने 20 चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. त्यामधील फक्त 10 चारा छावण्या सद्या सुरू आहेत.

author img

By

Published : Apr 30, 2019, 9:48 AM IST

शेतकऱ्यांशी चर्चा करताना आमचे प्रतिनिधी महेश जाधव

सातारा - माण तालुक्यात शासनाने 20 चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. त्यामधील फक्त 10 चारा छावण्या सद्या सुरू आहेत. यामुळे जनावरांचे हाल होत आहे. तसेच 60 ते 65 चारा छावण्यांच्या मंजुरीचे प्रस्ताव धूळ खात पडले आहेत. दुष्काळी भागातील अनेक ठिकाणी मागणी होत असून देखील प्रशासन याची दखल घेत नसल्याचे शेतकऱयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांशी चर्चा करताना आमचे प्रतिनिधी महेश जाधव

पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला. शासनाने 25 जानेवारीला चारा छावण्या सुरू करण्याची मान्यता प्रशासनाला दिली. मात्र कागदपत्राच्या प्रक्रियेत 25 जानेवारीच्या छावण्या सुरू होण्यासाठी शेतकऱ्यांना 25 एप्रिलची वाट पहावी लागली. दिवसेंदिवस चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शासनाने टँकर चालू केले पण पाणी 15 ते 20 दिवसातून मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

चारा छावणीमध्ये माळशिरस, अकलूज, बारामती आणि फलटण या भागातील ऊस, मका आणि कडवळ या प्रकारचा चारा उपलब्ध करण्यात येत आहे. मात्र तो पुरवठा अपुरा ठरत आहे. शेतकऱ्यांना मोठ्या जनावरांना 15 किलो तर लहान जनावरांना साडेसात किलो चारा देण्यात येत आहे. तो पुरत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मोठ्या जनावरांना 20 ते 25 किलो आणि लहान जनावरांना 15 किलो चाऱ्याची मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.

शासनाने छावणी चालकांना पेंड देण्यास सांगितले आहे. मात्र काही ठिकाणी पेंड दिली जात नाही. तसेच काही खाजगी छावण्याच्या ठिकाणी सर्व काही मिळत असून पाण्याची अडचण असल्याने 'त्या' चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. जनावरांची देखभाल करण्यासाठी डॉक्टरचे पथक नेमण्यात आले आहे. मात्र, अनेक छावण्यामध्ये डॉक्टर फिरकले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Intro:सातारा माण तालुक्यात शासनाने 20 चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. त्यामधील फक्त दहा चारा छावण्या चालू आहेत. तसेच 60 ते 65 प्रस्तव धूळ खात पडले आहेत. दुष्काळी भागातील अनेक ठिकाणी मागणी होत असून ही प्रशासन याची दखल घेत नसल्याचे शेतकरी बोलत आहेत.

Body:दुष्काळ जाहीर करून सात ते आठ महिने उलटले पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपस्थित होऊ लागला. याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी कानाडोळा करत असल्याने 25 जानेवारीला चारा छावण्या चालू करण्यासाठी शासनाने मान्यता दिली, मात्र कागद पत्राच्या विळख्यातून 25 जानेवारीच्या छावण्या चालू होण्यासाठी 25 एप्रिल ची वाट पाहण्यास शेतकरी वर्गाला लागली त्यामुळे शेतकऱ्यांन जवळ असलेला थोडा फार चारा सुद्धा संपला आहे. तर पाण्याची अवस्था देखील तशीच झाली आहे. शासनाने टँकर चालू केले पण पाणी पंधरा ते वीस दिवसातून मिळत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

आज सतार जिल्ह्यातील माण तालुक्यातील काही चारा छावण्या वरती भेट देऊन शेतकरीवर्गात असणाऱ्या आडी अडचणी तसेच त्याच्या मागण्या काय आहेत. ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शासनाची असणारी आकडेवारी कर्जमाफी तसेच शेतकरी मदत निधी 6000 खात्यावर आले आहेत की नाहीत ते शेतकऱ्यांना मिळाले का याची माहिती आपणास मिळत आहे.

चारा छावणीमध्ये चाऱ्यासाठी माळशिरस, अकलूज, बारामती फलटण या भागातील ऊस, मका, कडवळ या प्रकारचा चारा उपलब्ध केले जात आहे. त्या पद्धतीने पाणीपुरवठा केला जात आहे. जनावरांची देखभाल करण्यासाठी डॉक्टरचे पथक नसून अनेक छावण्यामध्ये डॉक्टर फिरकले नसल्याचे छावणीतील शेतकरी बोलून दाखवत आहेत. त्यामुळे प्रशासनाला कसलेच गांभीर्य नसल्याने दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना मोठ्या जनावरांना पंधरा किलो तर लहान जनावरांना साडेसात किलो चार दिले जात आहे. तो पुरत नसल्याचे देखील शेतकरी बोलून दाखवत आहेत. मात्र मोठ्या जनावरांना 20 ते 25 किलो लहान जनावरांना 15 किलो चाऱ्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

शासनाने छावणी चालकांना पेंड देण्यास सांगितले आहे. मात्र काही ठिकाणी पेंड दिली जात नाही. तसेच काही खाजगी छावण्याच्या ठिकाणी सर्व काही मिळत असून पाण्याची अडचण असल्याने त्या बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे.

नेत्यांची शेतकऱ्यांच्या दावणीला चाऱ्याची मागणी..?
अनेक नेते मंडळी दावणीला चारा देण्याची मागणी करत असताना, शेतकरी मात्र छावणीत बर आहे असे सांगत आहे. एक दोन दिवस चारा आला नाही तर आम्ही काहीतरी करू शकतो मात्र आपल्या भागात घरी चारा येईल का..? असा प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे नेत्यांच्या मागणीला शेतकरी विरोध करत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.