ETV Bharat / state

Buffalo on Gram Panchayat : शेतकरी चक्क रेडा घेऊन तक्रार करायला गेला ग्रामपंचायत कार्यालयात, वाचा संपूर्ण प्रकरण - Gram Panchayat office for complain in satara

कराड तालुक्यातील वडगाव हवेली गावातील एक शेतकरी चक्क रेडा घेऊन ( farmer took the buffalo ) तिसऱ्या मजल्यावर असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार ( on the Gram Panchayat office ) करायला पोहोचला. रेड्याला पाहून ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतकऱ्याची तक्रार ऐकून घेऊन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन देऊनही शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे तिसऱ्या मजल्यावरील ग्रामपंचायत कार्यालयात बराच वेळ गोंधळ सुरू होता. या घटनेची सातारा जिल्ह्यात गमतीदार चर्चा सुरू आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 8, 2022, 7:58 PM IST

सातारा - कराड तालुक्यातील वडगाव हवेली गावातील एक शेतकरी चक्क रेडा घेऊन ( farmer took the buffalo ) तिसऱ्या मजल्यावर असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार ( on the Gram Panchayat office ) करायला पोहोचला. रेड्याला पाहून ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतकऱ्याची तक्रार ऐकून घेऊन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन देऊनही शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे तिसऱ्या मजल्यावरील ग्रामपंचायत कार्यालयात बराच वेळ गोंधळ सुरू होता. या घटनेची सातारा जिल्ह्यात गमतीदार चर्चा सुरू आहे.

वडगाव हवेलीतील शेतकरी चक्क रेडा घेऊन तक्रार करण्यासाठी ग्रामपंचायतीत आला असताना

यामुळे थेट ग्रामपंचायतीवर घेऊन गेला रेडा - तक्रारदार शेतकऱ्याच्या राहत्या घराजवळून सांडपाण्याची पाईपलाईन गेली आहे. पाईपच्या लिकेजमुळे सांडपाणी साचून दलदल आणि दुर्गंधी पसरली आहे. कुटुंबाला त्याचा त्रास होत असल्याची दोन वर्षे तक्रार करूनही ग्रामपंचायतीने दुरूस्ती केली नाही, असा शेतकऱ्याचा आरोप आहे. या तक्रारीकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी चक्क रेडा घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाला.

तक्रारदाराला विरोधकांनी फूस लावल्याची चर्चा - वडगाव हवेली ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा लवकरच बिगुल वाजणार आहे. अशा परिस्थितीत तक्रारदार शेतकरी रेडा घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात गेल्यामुळे हा मुद्दा निवडणुकीत गाजणार आहे. संबंधित शेतकऱ्याला विरोधकांनी फूस लावून हा प्रकार करायला लावल्याची गावात चर्चा आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गावच्या 'दादा' नेत्याला फोन करून तक्रारदाराची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तुम्ही आल्याशिवाय मी रेडा घेऊन जाणार नाही, असा पवित्रा त्याने घेतला.

रेडा खाली आणताना दमछाक - वडगाव हवेली ग्रामपंचायत कार्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आहे. शेतकऱ्याने रेडा तिसऱ्या मजल्यावरील ग्रामपंचायत कार्यालयात घेऊन गेला. मात्र खाली आणताना शेतकऱ्यासह इतरांची चांगलीच दमछाक झाली. दरम्यान, या प्रकाराचा व्हिडिओ कोणीही व्हायरल करायचा नाही, असे ठरले. मात्र, कोणी तरी हा व्हिडिओ व्हायरल केला आणि या घटनेची गमतीदार चर्चा सुरू झाली.

ग्रामपंचायतीची तक्रारदाराला नोटीस - तक्रारदाराने ग्रामपंचायत कार्यालयात रेडा आणल्याने ग्रामपंचायतीची बदनामी झाली आहे. तसेच गावच्या लौकीकाला कमीपणा आल्याच्या कारणावरून ग्रामसेवकाने तक्रारदार शेतकऱ्याला नोटीस बजावली आहे. तसेच संबंधितावर कारवाईसाठी पोलिसांकडेही तक्रार अर्ज घेऊन गेले होते. मात्र रात्री उशीरापर्यंत संबंधित शेतकऱ्यावर कारवाई झालेली नव्हती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.