सातारा - कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे काल(13 जानेवारी) विहीरीत बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विकास विठ्ठल साळुंखे (वय 40), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा - सेल्फी बेतला जीवावर.. पैठणच्या १५ वर्षीय मुलाचा जायकवाडी धरणात बुडून मृत्यू
विकास साळुंखे हे फुटबॉलचा पाईप काढण्यासाठी विहीरीत उतरले होते. पाईप काढत असताना पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.