सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि कार्य जगासमोर नेण्यासाठी नवी दिल्लीत ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ उभारण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन केली आहे. अमित शाहांना दिलेल्या पत्रात राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखणारा कायदा आणावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे, या मागण्या देखील त्यांनी केल्या आहेत.
-
छत्रपती शिवाजी महाराज देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांचे चरित्र व कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ करावे अशी मागणी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. pic.twitter.com/dp8K8yB0cx
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) March 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">छत्रपती शिवाजी महाराज देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांचे चरित्र व कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ करावे अशी मागणी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. pic.twitter.com/dp8K8yB0cx
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) March 30, 2023छत्रपती शिवाजी महाराज देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांचे चरित्र व कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ करावे अशी मागणी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. pic.twitter.com/dp8K8yB0cx
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) March 30, 2023
राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखणारा कायदा करा - छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. त्याचबरोबर राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखणारा कायदा आणावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे, अशा मागण्या उदयनराजेंनी अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या भेटीवेळी केल्या.
छत्रपतींचे राष्ट्रीय स्मारक गरजेचे - ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ हे राज्यशास्त्र, प्रशासन, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुशास्त्र, कायदा, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रातील संशोधक आणि अभ्यासक यांच्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. महाराजांच्या इतिहासात सुसुत्रता आणण्यासाठी पुरातत्व सर्व्हेक्षण आणि पुराभिलेखागार विभागाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रकाशित दस्तऐवज, पेंटिग्ज, शस्त्रास्त्रे तसेच अन्य कागदपत्रांचे संकलन, संशोधन आणि संपादन करणे आवश्यक आहे. परदेशातील विविध संग्रहालयातून महत्वाची ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, चित्रे भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय स्मारक फार गरजेचे असल्याचे उदयनराजेंनी गृहमंत्री अमित शाह यांना सांगितले.
व्यापक समिती नेमावी - छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या धोरणाला काही लोकं सुरूंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाराजांचा अधिकृत इतिहास जगासमोर येण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने व्यापक समिती नेमून खरा इतिहास नव्याने मांडला पाहिजे. हा इतिहास खंड रूपात तसेच विविध भाषांमध्ये प्रकाशित केल्यास इतिहासाची मोडतोड करणाऱ्यांना पायबंद घातला जाईल, असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला.
अवमान रोखण्यासाठी कायदा करा - राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी आगामी अधिवेशनात राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखण्यासाठी नवीन कायदा करावा, अशीही मागणी उदयनराजेंनी केली. त्याबाबत कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा करून या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी अमित शाह यांनी उदयनराजेंना पुन्हा भेटीचे आश्वासन दिले.