ETV Bharat / state

'साहेब आम्ही तुमच्याच सोबत...' राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर भावनिक हाक - सोशल

राज्यभर राष्ट्रवादीची पडझड होत आहे. याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपण मात्र राष्ट्रवादीतच आहेत. हे दाखवण्यासाठी सोशल मीडियावर एक कॅम्पेन सुरू केले आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर भावनिक हाक
author img

By

Published : Jul 30, 2019, 6:56 PM IST

सातारा - जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळत चालल्याचे चित्र दिसत आहे. मात्र याच साताऱ्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर चालवलेल्या एका मोहिमेची सगळीकडेच चर्चा होत आहे.

कार्यकर्त्यांनी भावनिक साद

"साहेब कोणी कुठंही जाऊ द्या, आम्ही तुमच्या सोबत.."
"होय मी साहेबांसोबत आहे"
" साहेब आम्ही सोबत आहोत"

अशा प्रकारच्या कॅप्शन खाली स्वतःचा प्रोफाईल फोटो बनवत, येथील कार्यकर्त्यांनी एक भावनीक साद घालण्याचा प्रयत्न केला आहे.

सातारा जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. यामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील, माण खटावचे नेते शेखर गोरे यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला ढासळत चालला आहे, असे दिसत आहे. यावर सोशल मीडियावर सामान्य कार्यकर्त्यांनी इतर कार्यकर्त्यांना भावनिक हाक दिली आहे.

Intro:सातारा जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. यामध्ये आज आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील, माण खटावचे नेते शेखर गोरे यांनी पक्षाला सोड चिट्टी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला ढासळत चाला आहे. यावरती सोशल मीडियावर "साहेब कोणी कुठंही जाऊ द्या, आम्ही तुमच्या सोबत.." कार्यकर्त्यांनी भावनिक हाक दिली आहे.

Body:आज मुंबई येथे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राजीनामा दिला आहे. तसेच ते उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक बुरुज ढसाळा आहे. त्यामुळे कार्यकर्ते आपली इच्छा फेसबुक, व्हाटस अँप, इन्स्टाग्रामवर यावरती फोटो तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्या बातम्या व माहिती पोस्ट करून साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी हाक देत आहेत.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.