ETV Bharat / state

पर्यटकांसाठी महत्वाची बातमी.. महाबळेश्वरकडे येणा-जाणाऱ्या वाहतुकीत जून महिन्यात बदल - महाबळेश्वर पाचगणीत लाखो पर्यटक

उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे महाबळेश्वरात वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे ७ ते २५ जूनपर्यंत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक मार्गात बदल केला जाणार असल्याची माहिती महाबळेश्वर नगरपालिकेने प्रसिद्ध केली आहे.

traffic congestion
traffic congestion
author img

By

Published : Jun 6, 2023, 10:16 PM IST

सातारा - थंड हवेचे ठिकाण आणि महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असलेली महाबळेश्वर आणि पाचगणी ही पर्यटनस्थळे उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे गजबजून गेली आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे महाबळेश्वरात वाहतुकीची कोंडी होत असल्याने ७ ते २५ जून पर्यंत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक मार्गात बदल केला जाणार असल्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाबळेश्वर पाचगणीत लाखो पर्यटक - महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर व पाचगणी ही जागतिक दर्जाची थंड हवेची पर्यटनस्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. या दोन्ही पर्यटनस्थळांना देश-विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात. उन्हाळी सुट्टीमुळे मोठ्या संख्येने पर्यटक महाबळेश्वरला येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे.

प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल - पर्यटकांना वाहतूक कोंडीचा होणारा त्रास लक्षात घेऊन महाबळेश्वर नगरपालिका आणि पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक मार्गात बदल करण्याचे नियोजन केले आहे. दि. ७ ते दि. २५ जून दरम्यान दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी वाहतुक मार्गात बदल केला जाणार आहे. नागरिकांनी हरकती आणि सूचना disttraffic.satara@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर पाठविल्यास त्याचा सांगोपांग विचार करुन अंतिम अधिसूचना जारी करण्यात येणार जाणार आहे.

वाहतूक मार्गात असा आहे बदल...

📌 मुंबई-पुणे बाजुकडून महाबळेश्वरकडे येणारी वाहने सुरुर फाटा-वाई-पाचगणीमागर्गे महाबळेश्वरला येतील.

📌 पाचगणीकडून पुणे-मुंबईकडे जाताना पाचगणी-वाई-सुरुर फाटा या मार्गाने जाता येणार नाही. त्या ऐवजी पाचगणी-संजीवन विद्यालय, रुईघर महु डॅम मार्गे करहर, कोळेवाडी, कुडाळ, पाचवड फाटामार्गे पुणे या मार्गाचा वापर करायचा आहे.

📌 महाबळेश्वरकडून पुणे-मुंबईकडे जाणारी वाहने
मेढा-कुडाळ-पाचवड फाटा मार्गे किंवा मेढा-सातारामार्गे पुणे-मुंबईकडे जातील.

📌 महाबळेश्वरहून कोल्हापूरकडे आणि कोल्हापूरकडून महाबळेश्वरला येणा-जाणाऱ्या वाहनांना सातारा-मेढा या मार्गाचा वापर करता येईल.

📌 महाबळेश्वरहून पुणे-मुंबईकडे पाचगणी या मार्गे जाणारी वाहने लिंगमळ-मेढा-भेकवलीमार्गे महाबळेश्वर-मेढा मार्गावरील लिंगमळा फाटा-कुडाळ-पाचवड फाटा मार्गे पुण्याकडे वळविली जाईल.

📌 मुंबई पुणे बाजुकडून येणारी वाहने सुरूर फाटा-वाई-पाचगणी मार्गे महाबळेश्वरला जातील.

📌 महाबळेश्वरमधून पुणे-मुंबईकडे जाणारी वाहने मेढा-कुडाळ-पाचवड फाटा मार्गे जातील.

हेही वाचा - Sangli Accident: सातारा-महाबळेश्वर राज्यमार्गावर ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात; चौघेजण जागीच ठार, एक गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.