सातारा - महाबळेश्वर ( Mahabaleshwar ) तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ( Torrential Rains ) किल्ले प्रतापगड ( Fort Pratapgad ) रस्त्यावर दरड कोसळली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प ( Traffic jam on Fort Pratapgad route ) आहे. सध्या दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. मात्र, दरड कोसळल्याने वाहनधारकांचे मोठे हाल झाले. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे प्रतापगडावरील अफजलखान कबरीजवळच्या वळण रस्त्यावर मंगळवारी रात्री दरड कोसळली. यामुळे किल्ले प्रतापगडकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्याची माहिती रात्रीच प्रशासनाला मिळाली होती. परंतु, मुसळधार पाऊस आणि रात्रीची वेळ असल्याने तातडीने दरड हटविण्याचे काम हाती घेता आले नाही. आज युध्दपातळीवर दरड हटविण्याचे प्रयत्न सुरू आहे. सायंकाळपर्यंत प्रतापगडाकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होईल, असे बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले आहे.
संततधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका - पश्चिम भाग हा पावसाचे आगार समजला जातो. सध्या महाबळेश्वर, जावली तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मंगळवारी दिवसभर या भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे डोंगरकपारीतील कडे निसरडे झाले आहेत. रस्त्याकडेच्या डोंगराचा भाग धोकादायक बनला आहे. ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे वाहन चालकांना घाट रस्त्यावरून प्रवास करताना काळजी घ्यावी लागत आहे.
हेही वाचा - Spiritual Leader Murder : पैशाच्या वादातून मुस्लिम धर्मगुरू सुफी चिस्ती यांचा खून, संशयित ड्रायव्हर फरार