सातारा - वाईच्या प्राज्ञपाठ शाळा मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सरोजा भाटे यांची तर उपाध्यक्षपदी न्या. नरेंद्र चपळगांवकर यांची एक मताने निवड झाली. तसेच सचिव म्हणून अनिल जोशी तर सहसचिवपदी भालचंद्र मोने यांची निवड करण्यात आली आहे. प्राज्ञपाठ शाळा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त डॉ. शरद अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात सर्वानुमते या निवडी करण्यात आल्या आहेत.
या सभेत २०२० ते २०२५ या कालावधीसाठी संस्थेच्या अध्यक्ष म्हणून डॉ. सरोजा भाटे यांची तर उपाध्यक्षपदी न्या. नरेंद्र चपळगांवकर यांची एक मताने निवड झाली. तसेच सचिव म्हणून अनिल जोशी तर सहसचिवपदी भालचंद्र मोने यांची निवड करण्यात आली आहे. नवीन संचालक मंडळामध्ये डॉ. शंतनू अभ्यंकर, विवेक सावंत, डॉ. भाग्यलता पाटसकर, मोहन काकडे, डॉ. राजेंद्र प्रभुणे, भालचंद्र मोने, मदन प्रतापराव भोसले, डॉ. अनिमिष चव्हाण, नंदकुमार बागवडे यांचा समावेश आहे. तर स्वीकृत सदस्य म्हणून वासुदेव लक्ष्मणशास्त्री जोशी, मदनकुमार साळवेकर व शिवाजी राऊत यांची निवड झाली आहे.
'नवभारत'साठी संपादक मंडळाची स्थापना
दरम्यान, संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या 'नवभारत' या मासिकासाठी नवीन संपादक मंडळाची देखील स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये प्रमुख संपादक म्हणून, डॉ. राजा दीक्षित, कार्यकारी संपादक अनिल जोशी व नवीन संपादक मंडळामध्ये अशोक कृष्णाजी जोशी, किशोर बेडकिहाळ, डॉ. शंतनू अभ्यंकर व डॉ. राजेंद्र प्रभुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.