ETV Bharat / state

'मापात पाप करणाऱ्या' सातारा जिल्ह्यातील 26 स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई - district supply office satara

दुकानदारांकडून धान्याच्या गैरव्यवहाराची बाजारभावाने भरपाई वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित काही दुकानदारांना गैरप्रकारांबाबत नोटीस देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.

सातारा
सातारा
author img

By

Published : May 13, 2020, 4:43 PM IST

सातारा - मापात पाप आणि चढ्या दराने धान्य विकणाऱ्या जिल्ह्यातील 26 स्वस्त धान्य दुकांनावर जिल्हा पुरवठा कार्यालयाने कारवाई करून 11 दुकानदारांचे परवाने रद्द केले. 6 दुकानदारांचे परवाने निलंबित केले तर 3 दुकानांची संपूर्ण अनामत रक्कम जप्त केली आहे.

सातारा जिल्ह्यात एकूण 1 हजार 679 स्वस्त धान्य दुकाने असून विविध स्वरुपाच्या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. 6 दुकानदारांकडून धान्याच्या गैरव्यवहाराची बाजारभावाने भरपाई वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित काही दुकानदारांना गैरप्रकारांबाबत नोटीस देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.

यामध्ये लाभार्थ्यांना विहीत परिणामापेक्षा कमी धान्य देणे, जादा दर आकारणे. काही दुकानदारांनी ग्राहक यादीमध्ये नाव असतानाही धान्य देण्यास नकार दिला आहे, अंत्योदय व प्राधान्य कार्डवरील ऑनलाईन नोंद असणाऱ्या व्यक्ती संख्येपेक्षा कमी सदस्यांचे धान्य वितरण केल्याची प्रकरणेही पुढे आली आहेत, तसेच विक्री साठा लेखे प्रत्यक्ष विक्री केलेल्या धान्याशी न जुळणे, दर्शनी भागात भावफलक व प्राप्त धान्य माहिती न लावणे, उध्दट वर्तणूक करणे, ग्राहक रजिस्टर अद्यावत न ठेवणे, लाभार्थ्यांना पावत्या न देणे इत्यादी बाबत पुरवठा विभागाकडील भरारी पथकामार्फत तपासणीच्यावेळी गैरप्रकार निर्दशनास आले आहेत. संवेदनशीलपणे व जबाबदारीने काम न करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर यापुढेही कार्यवाही सुरूच राहणार आहे, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.