सातारा कोयना धरणासह जिल्ह्यातील एकूण सात धरणांमधून ४५ हजार क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू Discharge of 45 thousand cusecs of water आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली seven dams in Satara district आहे. एकट्या कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजांमधून सर्वाधिक ३२ हजार क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे.
नियोजनामुळे पुराचा धोका टळला जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या कार्यक्षेत्रात यंदा दमदार पाऊस पडला आहे. त्यामुळे सर्व धरणांमध्ये क्षमतेइतका पाणीसाठा Water dams situation in Satara झाला आहे. अजून पावसाचे दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सध्या धरणांमधून पाणी सोडले जात आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी सोडण्याचे नियोजन केल्यामुळे जिल्ह्यात यंदा पुराचा फारसा धोका निर्माण झाला नाही.
कोयनेच्या विसर्गाकडे अलमट्टी धरण व्यवस्थापनाचे असते लक्ष कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील Rain near Koyna Dam पाऊस, धरणातील पाणीसाठा आणि विसर्गाकडे सांगली, जयसिंगपूर, शिरोळ या तालुक्यांसह कर्नाटकचे लक्ष असते. कोयनेतून सोडलेल्या पाण्यामुळे पुराची परिस्थिती गंभीर होते. कोल्हापूरसह शिरोळ तालुक्याला पुराचा मोठा फटका बसतो. त्यामुळे कोयना धरणातील विसर्गानुसार अलमट्टीच्या व्यवस्थापनाला विसर्गाचा निर्णय घ्यावा लागतो.
कोकण मार्गावर नाकाबंदी रायगडमधील हरिहरेश्वर येथे आढळून आलेल्या संशयास्पद बोटीत तीन AK47 बंदुका, Suspected Boat In Raigad काडतुसे सापडल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या सुरक्षेत वाढ Enhance safety of Koyna Dam करण्यात आली आहे. तसेच कोकण मार्गावर नाकाबंदी Blockade on Konkan route केली जात आहे.
सातारा पोलीस प्रशासन अलर्ट राज्यातील सर्वात मोठ्या कोयना धरणावर चोवीस तास कडक सुरक्षा Round the clock security at Koyna Dam असते. तसेच सुरक्षेच्या अनुषंगाने वायरलेस यंत्रणा सज्ज असते. मात्र, हरिहरेश्वर येथील समुद्र किनारी संशयास्पद बोटीत घातक शस्त्रे आढळल्यानंतर Suspected Boat In Raigad कोयना धरणाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. उद्योग विश्वाचा कणा असणाऱ्या या धरणाच्या सुरक्षेला शासनाचे कायमच प्राधान्य असते.
कोकण प्रवेशद्वारावर नाकाबंदी - कराड-पाटण मार्ग हा कोकणचे प्रवेशद्वार आहे. या मार्गावर सध्या नाकाबंदी करण्यात आली आहे. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याची हद्द असणाऱ्या घाटमाथ्यावर कोकणातून कराडकडे येणाऱ्या आणि कराडहून कोकणात जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे.
हेही वाचा कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटावर स्थिर केल्याने पाणीसाठा नव्वदीपार