ETV Bharat / state

धनगर आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर; खंबाटकी घाटात आज 'रास्ता रोको', जमावबंदी आदेश लागू

Dhangar Reservation Protest : धनगर समाजाला आरक्षण मिळावं, यासह अन्य मागण्यांसाठी खंबाटकी घाट मार्गावर आज (1 डिसेंबर) धनगर समाजाच्यावतीनं शेळ्या-मेंढ्यांसह रास्ता रोको केला जाणार आहे. त्यामुळं पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

Dhangar Reservation Protest
खंबाटकी घाटात आज रास्ता रोको
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 10:16 AM IST

सातारा Dhangar Reservation Protest : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीनं आता राज्यभर जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी लोणंद (ता. खंडाळा) इथं गेल्या काही दिवसापासून धनगर समाजाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू आहे. तसंच या आंदोलकांच्या समर्थनार्थ आज (1 डिसेंबर) खंबाटकी घाटात 11 वाजताच्या सुमारास रास्ता रोको करणार असल्याचा इशारा धनगर समाज बांधवांनी दिला आहे. दरम्यान, धनगर समाजाच्या प्रतिनिधींमध्ये पार पडलेल्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं धनगर बांधवांनी आंदोलनाची ठाम भूमिका घेतली आहे. दरम्यान धनगर आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सातारा पोलिसांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे.

आंदोलकांची प्रकृती खालावली : धनगर आरक्षणासाठी उपोषण करणारे लोणंदमधील उपोषणकर्ते गणेश केसकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची शासनाकडून आणि विशेषत: सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल न घेतल्यानं धनगर बांधव आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पारंपरिक वेशभूषा करुन धनगर बांधव शेळ्या-मेंढ्यांसह महामार्गावर उतरणार आहेत. त्यामुळं जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सातारा पोलिसांचा कडक बंदोबस्त : धनगर समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दलाकडून कडक बंदोबस्ताची तयारी करण्यात आलीय. खंबाटकी घाट मार्गावर आंदोलन होणार असल्यामुळं पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. तसंच महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना या आंदोलनाचा फटका बसणार आहे.

नीरा नदीत आंदोलकांचा जलसमाधीचा प्रयत्न : दरम्यान, गणेश केसकर यांच्या आंदोलनाची शासनानं दखल घ्यावी, यासाठी काही दिवसांपूर्वी सकल धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं नीरा नदीत दत्त घाटावर जाऊन पाण्यात उतरुन तासभर जलसमाधी आंदोलन छेडलं होतं. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. नीरा नदीवर आंदोलनस्थळी खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील आणि फलटण विभागाचे पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांनी आंदोलकांशी चर्चा केली. धनगडऐवजी धनगर दुरुस्तीचं शिफारस पत्र राज्यपालांनी दोन दिवसात द्यावं, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा -

  1. Bombay High Court : धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश नाही ; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
  2. १० लाख रुपयाच्या मदतीचे स्वागत मात्र धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अजून किती शहीद होणार
  3. Cabinet Meeting : धनगर समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकार करणार समिती गठीत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.