ETV Bharat / state

चुकीच्या मतदारसंघ पुनर्रचनेमुळे लोकप्रतिनिधींचा विकास निधी तोकडा- उदयनराजे

मतदारसंघ पुनर्रचनेत मतदारांच्या हिताचा विचार करण्यात आलेला नाही. राजकीय सोयीच्या दृष्टीने मतदारसंघ पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे मतदारांचे फार मोठे नुकसान झाले. चुकीच्या पद्धतीने मतदारसंघ तयार केल्यामुळे लोकप्रतिनिधींना मिळणारा निधी व मतदार संघाची मागणी यामध्ये फार मोठा फरक पडत आहे. असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

MP Udayan Raje Bhosale
खासदार उदयनराजे भोसले
author img

By

Published : Oct 24, 2020, 9:04 AM IST

सातारा- चुकीच्या पद्धतीने मतदारसंघ पुनर्रचना झाल्याने मतदारसंघाचे आकारमान मोठे झाले. त्यामुळे खासदार आणि आमदारांचा विकास निधी फारच तोकडा पडतो आहे. त्यामुळे महानगरातील लोकप्रतिनिधींचा निधी कमी करून तो इतरत्र वाढविण्याची गरज आहे, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. वाई पालिकेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उदयनराजेंनी बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे, मुख्याधिकारी विद्या पोळ, नगरसेविका रुपाली वनारसे, विकास शिंदे, अॅड दत्ता बनकर आदी उपस्थित होते.

मतदारसंघ पुनर्रचनेत मतदारांच्या हिताचा विचार करण्यात आलेला नाही. तर राजकीय सोयीच्या दृष्टीने पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे मतदारांचे फार मोठे नुकसान झाले. चुकीच्या पद्धतीने मतदारसंघ तयार केल्यामुळे लोकप्रतिनिधींना मिळणारा निधी व मतदार संघाची मागणी यामध्ये फार मोठा फरक पडत आहे. लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि खासदारांना पाच कोटी रुपये आणि विधानसभा मतदारसंघात तीन तालुके येतात व आमदारांना दोन कोटी रुपये विकासकामांसाठी येतात. मात्र मतदारसंघाची मागणी मोठी असल्यामुळे निधी अपुरा पडत असल्याची तक्रार खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळूरू, अहमदाबाद सारख्या महानगरांमध्ये मोठ्या मोठ्या महापालिका असतात. त्यांचा स्वतःचा निधी व तेथील नगरसेवकांचा निधीही मोठा असतो. ग्रामीण भागात मतदारसंघ मोठे आणि निधी तोकडा पडत असल्याने विकास कामे करता येत नाहीत. यासाठी महानगरांमधील खासदार, आमदार निधी कमी करून तो ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींचा निधी वाढविल्यास अडचणी सोडविता येतील. हल्ली लोकांना खासदार आमदार कोण आहे, त्यापेक्षा विकास महत्त्वाचा आहे. जर विकासच झाला नाही तर सब कुछ झुट आहे. त्यामुळे संबंधितांनी याचा योग्य तो विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

सातारा शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे. त्यामानाने वाई शहरात विकासकामे कमी असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवकांनी व नगराध्यक्षांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून आमदार-खासदार कोण आहे याकडे लक्ष न देता शहराच्या विकासाला प्राधान्य द्यावे. निवडून आलेल्या नगरसेवकांनाही मतदारांना उत्तरे द्यायची असतात. प्रशासनाने दुजाभाव न करता सर्वांच्या विकासात्मक कामांना प्राधान्य द्यावे. यावेळी अजित वनारसे, विजय ढेकाणे, तुषार चक्के, पालिका निरीक्षक नारायण गोसावी, सचिन झेंडे आदी उपस्थित होते.

तर पुणे- सातारा रस्ता जेसीबीने उखडणार - उदयनराजे

पुणे सातारा महामार्ग खराब झाल्याने रस्ते विकास महामंडळाला संबंधित ठेकेदाराचे काम काढून घेण्याबाबत कळविले आहे. रस्ता खराब झाल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तर अनेकांना प्राण गमवावे लागले. लवकरच रस्ता दुरुस्त झाला नाही तर स्वतः जेसीबी घेऊन रस्ता उघडून टाकेन, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.