सातारा - कडक निर्बंधांनंतर सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा स्तर झपाट्याने घसरत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 832 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तर पाॅझिटीव्हिटी रेट 8.33 टक्के इतका खाली आला आहे.
832 नागरिक कोरोनाबाधित
मंगळवारी 9 हजार 988 जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 832 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले होते. बाधितांमधे कराड तालुक्यात सर्वाधिक 204 रुग्ण आढळून आले आहेत. तर जावळीत 25, खंडाळा 33, खटाव 97, सातारा 192, कोरेगाव 54, माण 66, महाबळेश्वर 2, पाटण 42, फलटण 76, वाई 29 व इतर 12 असे तालुकानिहाय कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज अखेर एकूण 1 लाख 82 हजार नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत.
29 रुग्ण दगावले
मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये जावली 1, कराड 4, खंडाळा 2, कोरेगाव 5, खटाव 3, सातारा 12, पाटण 2 यांचा समावेश आहे. मंगळवार अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4 हजार 94 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 8 हजार 512 रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.
1 हजार 587 नागरिकांना डिस्चार्ज
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 1 हजार 587 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 1 लाख 69 हजार 596 नागरीक या आजारातून बरे झाले आहेत.
साताऱ्यात कोरोना रुग्णांत घट; पाॅझिटीव्हिटी रेट 8.33 वर
मंगळवारी 9 हजार 988 जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 832 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले होते. बाधितांमधे कराड तालुक्यात सर्वाधिक 204 रुग्ण आढळून आले आहेत.