ETV Bharat / state

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरूणीचा सडलेला मृतदेह; हत्या झाल्याचा संशय

एमपीएससची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २६ वर्षीय तरुणीचा सडलेला मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळून आला आहे. दर्शना दत्तू पवार, असे मृत तरुणीचे नाव असून आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. तरुणीची हत्या झाली असावी, असा पोलिसांना संशय आहे.

दर्शना दत्तू पवार
दर्शना दत्तू पवार
author img

By

Published : Jun 18, 2023, 9:17 PM IST

सातारा - पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नुकतीच एमपीएससची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २६ वर्षीय तरुणीचा सडलेला मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सतीच्या माळावर आढळून आला आहे. दर्शना दत्तू पवार, असे मृत तरुणीचे नाव असून आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. तरूणीची हत्या झाली असावी, असा पोलिसांना संशय आहे.

मृतदेहाशेजारी आढळला बूट, गॉगल, मोबाईल - मृतदेहाच्या शेजारी पांढऱ्या रंगाचे बूट, गुलाबी कव्हर असलेला मोबाईल, काळ्या रंगाचा गॉगल, काळ्या रंगाची बॅग, काळ्या निळ्या रंगाचे जर्कीन पडले होते. पोलिसांनी वायरलेसवरुन नजीकच्या पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून माहिती घेतली असता सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये तरूणी बेपत्ता असल्याची तक्रार नोंद असल्याची माहिती मिळाली. वेल्हे पोलिसांनी तरुणीच्या वडीलांना बोलावून घेतले. ते घटनास्थळी आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली.

वनपरिक्षेत्र अधिकारीपदी झाली होती निवड - तरूणीचे वडील दत्तू दिनकर पवार (रा. सहजानंदनगर, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांची मुलगी दर्शना ही नुकतीच एमपीएसी परीक्षा उत्तीर्ण झाली होती. राज्यात ती ६ वी आली होती. तिची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झाली होती.

सत्कारासाठी आली अन बेपत्ता झाली - एमपीएससीतील यशाबद्दल आयोजित सत्कारासाठी दि. ९ जून रोजी ती पुण्यातील स्पॉटलाईट अकॅडमीत गेली होती. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४ पर्यंत ती वडीलांच्या संपर्कात होती. त्यानंतर फोन करुनही फोन उचलला नाही. म्हणून वडिलांनी अकॅडमीत चौकशी केली असता दर्शना ही तिचा मित्र राहूल हंडोरे सोबत सिंहगड व राजगड पाहण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. दोघेही तेव्हापासून कोणाच्याच संपर्कात नव्हते.

वडीलांनी मुलीचा मृतदेह ओळखला - मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दत्तू पवार यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. रविवारी राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह आढळल्यानंतर वेल्हे पोलिसांनी दत्तू पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी मृतदेह मुलगी दर्शनाचाच असल्याचे पोलिसांना सांगितले. हा घातपात आहे की आत्महत्या, याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.