सातारा - मांढरदेव (ता. वाई) येथे युवकाचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळला. या युवकाचा घातपाताने खून झाल्याची परिसरात चर्चा होती. पोलीस पाटील जयश्री सुनील मांढरे यांनी वाई पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली होती.
हेही वाचा - 'त्या' माय-माऊलीला अखेर पांडुरंगाचे घडले दर्शन
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, काळूबाईची जाळी जुने ठाण या ठिकाणी असलेल्या पुलाच्या डाव्या बाजूला भोर बाजूच्या दरीत पोलिसांना अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला. युवकाच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग असून तो 35 ते 40 वय वर्षाचा असल्याचे समजले आहे. युवकाचा रंग सावळा असून मजबूत बांधा आहे. त्याची उंची सुमारे चार फूट तीन इंच असून त्याने अंगात पांढऱ्या रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. याप्रकरणी अधिक तपास वाईचे पोलीस नायक एस.एस. वायदंडे करीत आहेत.
हेही वाचा - परवानगी शिवाय नंदीध्वजाची पूजा, सिद्धेश्वर मंदिरात असंतोष