ETV Bharat / state

पुसेगावचा धोकादायक गुंड शितल उर्फ नितीन खरात 'एमपीडीए'खाली स्थानबद्ध - satara latest update

पुसेगावचा धोकादायक गुंड शितल उर्फ नितीन खरात 'एमपीडीए'खाली स्थानबद्ध करण्यात आले आहे. सार्वजनिक शांततेस धोका असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला.

गुंड शितल उर्फ नितीन खरात
गुंड शितल उर्फ नितीन खरात
author img

By

Published : Dec 4, 2020, 9:33 PM IST

सातारा - पुसेगाव (ता.खटाव) येथील धोकादायक गुंड शितल उर्फ नितीन खरातला (वय २८) याला 'एमपीडीए' कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करुन त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ही तिसरी मोठी कारवाई आहे.

अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद-

खून, जीवे मारण्याचा प्रयत्न, कट रचून- भीती घालून खंडणी उकळणे, मालमत्तेचे नुकसान, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, दहशत निर्माण करुन मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशीर जमाव गोळा करुन दहशत करणे, असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्याकडून सार्वजनिक शांततेस धोका असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला.

जिल्हा कारागृहात स्थानबद्ध-

पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक व्ही. बी. घोडके यांनी हा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांना पाठवला होता. तो धोकादायक व्यक्ती झाल्याची खात्री झाल्याने त्यास स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याची रवानगी सातारा जिल्हा कारागृहात करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील तिसरी मोठी कारवाई-

यापुर्वी सातारा शहर पोलीस ठाण्यांतर्गत दत्ता जाधव याच्यावर २००७ मध्ये एमपीडीए या कायद्याखाली कारवाई झाली आहे. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्याखाली (एमपीडीए) कराडच्या अमीर शेखवर अ‌ॅागस्ट मध्ये दुसरी कारवाई झाली. तिनच महिन्यात आणखी एकावर या कायद्याचा वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा- नाशिक : डेटिंग अ‌ॅपवरून महिला असल्याचे भासवून ऑनलाइन फसवणूक, व्यापाऱ्याला 19 लाखांना चुना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.