ETV Bharat / state

कोयना धरणाचे वक्र दरवाजे १ फूट ९ इंचाने उघडले; १०,४१० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे शनिवारी सकाळी १ फूट ९ इंचाने उघडण्यात आले असून १०,४१० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू झाला आहे. पाणी पातळी वाढणार असल्याने कोयना-कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

कोयना धरणाचे वक्र दरवाजे १ फूट ९ इंचाने उघडले

author img

By

Published : Aug 15, 2020, 2:26 PM IST

कराड (सातारा) - कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे शनिवारी सकाळी १ फूट ९ इंचाने उघडण्यात आले असून १०,४१० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू झाला आहे. सांडव्यावरून ९,३६० क्युसेक आणि वीजगृहातून १,०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याची पातळी वाढणार असल्याने कोयना-कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

महाराष्ट्राची भाग्यरेषा अशी कोयना धरणाची ओळख आहे. सध्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी शनिवारी सकाळी ११ वाजता धरणाचे वक्र दरवाजे १ फूट ९ इंचाने उचलून ९,१७२ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. आज सकाळी ९ वाजता धरणातील एकूण पाणीसाठा ८६.४ टीएमसी आणि धरणाची पाणी पातळी २१४७.११ फूट झाली होती. तसेच ४१ हजार ३९१ क्युसेक पाण्याची आवक धरणात होत होती. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्यामुळे आणि पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शनिवारी सहा वक्र दरवाजे उघडून कोयना नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनाने घेतला. त्यानुसार १०,४१० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये. सतर्क रहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.