ETV Bharat / state

Burglary In Phaltan : फलटणमध्ये भरवस्तीत घरफोडी, 20 तोळ्याच्या दागिन्यांसह 25 हजाराची रोकड लंपास - फलटणमध्ये बंद बंगल्यात घरफोडी

सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये भरवस्तीतील बंद घरावर पाळत ठेऊन चोरट्यांनी 20 तोळे दागिन्यांसह 25 हजारांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे फलटण शहरात खळबळ उडाली आहे.

Burglary In Phaltan
घरफोडी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 5:07 PM IST

Updated : Aug 27, 2023, 6:05 PM IST

सातारा: फलटणमध्ये भरवस्तीतील बंद पॉश बंगला फोडून चोरट्यांनी 20 तोळे दागिन्यांसह 25 हजारांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, श्वान परिसरातच घुटमळले. दरम्यान, बंद घरावर पाळत ठेऊन चोरट्यांनी हा डाव साधल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कडी-कोयंडा तोडून घरात घुसले: फलटण शहरातील कॉलेज रोडवर असलेल्या शुक्रवार पेठेतील अनघा या बंगल्यात ही धाडसी घरफोडी झाली आहे. घर मालक दिलीप फणसे हे मंगळवारी कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. त्यामुळे बंगल्यात कोणीही नव्हते. बंद बंगला हेरून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यातील तिजोरी, कपाटे फोडून दागिने आणि रोकड लंपास केली. चोरी करताना तिजोरी आणि कपाटातील संपूर्ण साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते.

फ्रिजमधील खाद्य पदार्थांवर ताव: बंगल्यात चोरी झाल्याची खबर फणसे कुटुंबीयांना शेजाऱ्यांनी शनिवारी रात्री दिल्यानंतर परगावी गेलेले फणसे कुटुंब रात्रीच फलटणमध्ये दाखल झाले. चोरट्यांनी तिजोरी आणि कपाटामध्ये ठेवलेले 20 तोळे सोन्याचे दागिने आणि 25 हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच चोरट्यांनी फ्रीज उघडून आतील खाद्यपदार्थांवर ताव मारल्याचे दिसून आले. चोरी करताना चोरट्यांनी कपाटातील सर्व साहित्य खोलीत अस्ताव्यस्त फेकून दिले होते.

श्वान पथकासह ठसे तज्ज्ञ दाखल: फणसे कुटुंबीयांनी चोरीच्या घटनेची माहिती कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला देखील पाचारण केले. श्वान त्याच परिसरात घुटमळले. ठसे तज्ज्ञांना काही वस्तुंवर ठसे मिळाले. मात्र, घरफोडीचे धागेदोरे पोलिसांना अद्याप मिळालेले नाहीत. चोरट्यांनी लक्ष ठेवून बंद घरात चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान फलटण पोलिसांसमोर आहे.

मुंबईतही अशाच प्रकारे चोरी: मुंबईतही एका इंजिनिअरच्या बंगल्यामध्ये अशाच प्रकारे चोरी झाली होती. यामध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद बंगला फोडून 5 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. बंगलामालक बाहेरगावाहून घरी परतल्यानंतर चोरीचा उलगडा झाला होता.

हेही वाचा:

  1. Thane Crime: व्यावसायिक लग्नकार्यी गेले अन् चोरट्याने मारला घरावर डल्ला
  2. Shegaon House Burglary Case: शेगांव येथील धाडसी घरफोडीची स्थानिक गुन्हे शाखेकडून उकल; 11 जणांना अटक
  3. Daring House Burglary : कुटुंबीय परगावी गेल्याची संधी साधत बंद घरात टाकला दरोडा; 25 तोळ्यांच्या दागिन्यांवर हात साफ

Last Updated : Aug 27, 2023, 6:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.