ETV Bharat / state

'राज्यात सोमवारपासून कापूस खरेदी सुरू होणार'

सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या घरातच आहे. तो खरेदी करणे आवश्यक आहे. विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यात कापसाचे पीक घेतले जाते. हा कापूस खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

बाळासाहेब पाटील
बाळासाहेब पाटील
author img

By

Published : Apr 18, 2020, 8:07 PM IST

Updated : Apr 18, 2020, 8:28 PM IST

कराड (सातारा) - विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह संपूर्ण राज्यात येत्या २० एप्रिलपासून कापूस खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. लॉकडाऊनमधील सूचनांचे पालन करून कापूस खरेदी करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या असल्याचेही पाटील म्हणाले.

बाळासाहेब पाटील, सहकार आणि पणनमंत्री

सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या घरातच आहे. तो खरेदी करणे आवश्यक आहे. विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यात कापसाचे पीक घेतले जाते. हा कापूस खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले. लॉकडाऊनमधील सूचनांचे पालन करून कापूस खरेदीचे व्यवहार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचेही पाटील म्हणाले.

हेही वाचा - चिमुकल्या भावंडांचा संचारबंदीतच 'रमजान'; महिनाभर एक वेळ उपाशी राहून 'यांना' केली मदत

शेतकऱ्यांचे अर्थकारण कापूस उद्योगावर अवलंबून आहे. कापसाचे उत्पन्न चांगले झाले आहे. शेती पूरक उद्योगांना वाव देण्याची केंद्र आणि राज्य शासनाची भूमिका आहे. चांगल्या प्रतीच्या कापसाचे उत्पादन झाले आहे. तो कापूस शेतकऱ्यांनी केंद्रावर आणावा. कापूस खरेदी केंद्र आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी संयुक्त नियोजन करावे. जे शेतकरी ऑनलाईन व फोनद्वारे बुकिंग करतात त्या शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत कापूस केंद्रावर आणायचा, हे त्यांना कळवले जाणार आहे. कापसाची प्रत तपासून, त्याचे वजन करून कापूस खरेदी केली जाईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

Last Updated : Apr 18, 2020, 8:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.