सातारा - जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू करत निर्बंध कडक केले आहेत. अत्यावश्यक सेवेची दुकाने दुपारी दोननंतर बंद करावी लागणार आहेत. तर इतर दुकाने पूर्ण काळ बंदच राहणार आहेत.
स्टेशनरी घरपोच सेवा -
जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार सायंकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत तसेच शनिवार व रविवारी पूर्ण कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक नसलेली दुकाने/ अस्थापना या पूर्णपणे बंद राहतील. तथापि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत स्टेशनरी घरपोच पुरवण्यास जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिली आहे
साताऱ्यात कोरोनाचा विळखा वाढला.. नव्या आदेशातील तरतुदी - - अत्यावश्यक बाबींची दुकाने अस्थापना या सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू ठेवता येतील.
- औषधांची दुकाने सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू राहतील.
- हॉटेल रेस्टॉरंट ही केवळ पार्सल घरपोचसाठी सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू ठेवता येतील. या ठिकाणी बसण्यास परवानगी नाही.
- लॉजिंग सुविधा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
- सर्व जागा, खुली मैदाने, चालणे, सायकल चालविणे यासाठी सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये सकाळी सकाळी पाच ते नऊ या वेळात परवानगी असेल. आठवड्याचे शेवटचे म्हणजेच शनिवार-रविवार यास मनाई आहे.
- शासकीय कार्यालय व ज्या कार्यालयांना परवानगी देण्यात आली आहे अशी कार्यालये 25% क्षमतेने चालू ठेवता येतील.
- केशकर्तनालय, सौंदर्य केंद्रे येथे फक्त लस घेतलेल्या ग्राहकांसाठी अगोदर भेटीची वेळ ठरवून तसेच विना वातानुकूलित जागेसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील.- -जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.