ETV Bharat / state

'व्हेंटिलेटर' अभावी रुग्णालयासमोरच कोरोनाग्रस्ताने सोडला जीव; मृतदेह तीन तास रिक्षातच - सातारा कोरोना बातमी

मेढा ग्रामीण रुग्णालयासमोर ऑक्सीजन व व्हेंटिलेटर अभावी एका कोरोनाग्रस्ताचा रिक्षातच मृत्यू झाला. मृत्यूनंतरही रुग्णालयात कर्मचारी नसल्याचे कारण देत रुग्णालय प्रशासनाने मृतदेह रुग्णालयात नेला नाही. तब्बल तीन तासानंतर रिक्षातून त्या रुग्णाला घेऊन आलेल्यांनीच मृतदेह रुग्णालयात नेला.

satara
मृतदेह नेताना सहकारी
author img

By

Published : Sep 6, 2020, 7:09 PM IST

Updated : Sep 6, 2020, 7:47 PM IST

जावळी (सातारा) - तालुक्यातील मेढा ग्रामीण रुग्णालयाच्या समोर व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन अभावी एका कोरोनाग्रस्ताचा रिक्षातच मृत्यू झाला. मृत्यूनंतरही तब्बल तीन तास ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात रिक्षात मृतदेह पडून होता.

बोलताना रिक्षा चालक

रिक्षामध्ये पडलेला मृतदेह परप्रांतीय मजुराचा असल्याची माहिती समोर आली आहे. तो परप्रांतीय मजूर झारखंडचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून त्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्याला जास्त त्रास होत असल्याने काही सहकाऱ्यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, रुग्णालयात तत्काळ त्याला दाखल करुन घेण्यात आले नाही किंवा व्हेंटीलेटर व ऑक्सीजनचा पुरवठा त्या रुग्णाला देण्यात आला नाही. अखेत ऑक्सीजन वेळेवर न मिळाल्याने त्याचा रिक्षातच मृत्यू झाला.

हा दुर्दैवी प्रकार घडत असताना रुग्णालयातील कोणताच कर्मचारी मदतीला धावला नाही. त्या रुग्णाच्या मृत्यूनंतरही तब्बल तीन तास त्यांना ताटकळत बसावे लागले. मृतदेह रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णालयाचा एकही कर्मचाी धावला नाही. शेवटी तो मृतदेह ज्यांनी त्याला रिक्षातून आणले होते, त्यांनी रुग्णालयात नेले. त्यानंतर एका तासानंतर त्या मृत रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

ऑक्सिजन व खाटा न मिळण्याची अडचण ग्रामीण भागातही भासत आहे. मेढा येथील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मात्र, आरोग्य विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे निदर्शनास येत आहे. जावळी तालुक्यातील मेढा येथे कोरोनाग्रस्तांचे द्विशतक होण्याची वेळ आली आहे. कोरोना बाधित रुग्ण रुग्णालयाच्या दारात मरत आहेत. तरीही अद्ययावत यंत्रणा ग्रामीण भागात उपलब्ध होत नाही, याचे आश्चर्य सर्वांना वाटते.

एकीकडे जिल्ह्यातच ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची कमतरता आहे. जावळी, पाटणसारख्या दुर्गम-डोंगराळ भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तेथील लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने तात्काळ अद्यावत आरोग्य यंत्रणा उभारावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हेही वाचा - अ‌ॅट्रोसिटी'ची भीती घालून ८ लाखांची खंडणी मागणाऱ्याला अटक; शाहूपुरी पोलिसांची कारवाई

Last Updated : Sep 6, 2020, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.