सातारा - राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र, नॉन रेडझोनमध्ये स्थानिक परिस्थिनुरूप यामध्ये शिथिलता देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे सातारा जिल्ह्यातील नागरिकांनाही लॉकडाऊनमधून सशर्त शिथिलता देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये सुरक्षित शारीरिक अंतर व सफाई व्यवस्थेची खबरदारी घेऊन, विहीत केलेल्या प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने जिल्ह्यांतर्गत एसटी बस सेवा सुरू करण्यास व सर्व मार्केट व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू करण्यास, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी दिली आहे.
कोविड-19 विषाणू संसर्गाबाबत शासनाने सातारा जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोमध्ये केलेला आहे. त्याअनुषंगाने सुरक्षित शारीरिक अंतर व सफाई व्यवस्थेची खबरदारी घेऊन, विहीत केलेल्या प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने जिल्ह्यांतर्गत एसटी बस सेवा सुरु करण्यास व सर्व मार्केट व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू करण्यास, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी दिली आहे. शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रे (कंटेन्मेंट झोन) वगळून तसेच सातारा शहरातील 6 कंटेन्मेंट झोन तसेच पोवई नाका ते नगरपालिका रस्ता, नगर पालिका रस्ता ते राजवाडा (राजपथ), पोवई नाका ते शाहू स्टेडीयम रस्ता, एसटी स्टॅन्ड ते राधिका चौक (राधिका रोड), पोवई नाका ते पोलीस मुख्यालय मार्गे मोती चौक हे प्रतिबंधित रस्ते वगळून हे आदेश सर्व क्षेत्रासाठी लागू राहतील, असे सांगितलं आहे.
जिल्ह्यात काय राहणार बंद -
सर्व चित्रपट गृहे, शॉपिंग मॉल, जिम, स्विमींग पुल, एंटरटेंमेंट पार्क, बार्स ॲन्ड ऑडिटोरियम, असेंम्बली हॉल, मंगल कार्यालय हे सर्व बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे व मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम बंद राहतील. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे बंद राहतील.
हेही वाचा - साताऱ्यातील पाटणमध्ये कोरोनाचा शिरकाव, प्रशासकीय पातळीवर कडक उपाययोजना
हेही वाचा - चिकन खातंय भाव... कोंबड्या संपल्याना राव..., दिवसागणिक दरामध्ये मोठी वाढ