ETV Bharat / state

खासदार भाजपचे मात्र पायघड्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या, नागरिकांमध्ये चर्चा - VBA

काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आपले मित्र असणारे भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी पक्षाचा विचार न करता भव्य सभा घेत माण-खटावमध्ये घेऊन पाठिंबा दिला होता.

संपादीत छायाचित्र
author img

By

Published : May 28, 2019, 8:30 AM IST

Updated : May 28, 2019, 10:57 AM IST

सातारा - माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचे नवनिर्वाचीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा युतीच्या कार्यकर्त्यांपेक्षा काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांसोबतचा वाढता संपर्क चर्चेचा विषय ठरत आहे. खासदार भाजपचा मात्र पायघड्या आघाडीच्या अशी चर्चा मतदारसंघात रंगत आहे. निंबाळकर यांच्या विजयात काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचा मोठा हात असल्याचे मानले जाते. माण-खटावमधून निंबाळकरांना काँग्रेस आमदार गोरे यांनी उघड-उघड पाठिंबा देऊन पक्षाचा रोषही ओढावून घेतला आहे.

आमदार गोरे यांनी माण-खटावमध्ये जाहीर सभेचे आयोजन करुन निंबाळकरांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यांच्या इशाऱ्यावर काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांपासून पंचायत समिती, नगरपालिका नगराध्यक्ष आणि नगरसेवक तसेच ग्रामपंचायत सदस्यांनीही लोकसभा निवडणुकीत निंबाळकरांचे काम केले होते. याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला. निंबाळकरांना माण-खटावमधून २३ हजारांचे मताधिक्य मिळाले. या सर्व परिस्थितीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माण-खटावचा मुद्दा चर्चेने सोडवला जाईल असे म्हटले होते. परंतू आमदार गोरे यांनी पक्षाचा कोणताही मुलाहिजा न ठेवता उघडपणे निंबाळकरांचा प्रचार केला आणि त्यांना विजयापर्यंत घेऊन गेले.

नवनिर्वाचित खासदार निंबाळकर हे भाजपच्या कार्यक्रमांना जाण्याचे टाळून आमदार गोरे यांच्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. तसेच वाड्या-वस्त्यांना भेटी देत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आमदार गोरे व काँग्रेसचे पदाधिकारी दिसून येतात. भाजपचा एकही कार्यकर्ता त्यांच्यासमवेत पाहायला मिळत नाही. त्यामुळे खासदार नक्की भाजपचा की काँग्रेसचा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे.

Intro:सातारा:- माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तब्बल पाऊण लाखाचा मताने निवडून आले. मात्र त्यांना निवडून आणण्यात काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचा मोठा हात आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी आपले मित्र असणारे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी पक्षाचा विचार न करता भव्य सभा माण खटाव मध्ये घेऊन पाठिंबा दिला होता. यावरती राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी आम्ही बसून विषय मिटवणार आहोत. असे सांगितले होते. मात्र त्याचा कोणताही परिणाम राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या वरती झाला नाही. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मदत करून त्यांना विजय करून दाखवून दिला आहे.

Body:यावेळी जिल्हा परिषद सदस्य पासून पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यांनीदेखील भाजपाचे काम करून आमदार जयकुमार गोरे म्हणतील तेच खरं करून दाखवले. यामुळे भाजीपाला माण- खटाव मधून मोठे पाठबळ मिळाले खरे, मात्र त्याचे मता मध्ये परिवर्तन झालेले दिसून आले नाही. कारण तालुक्यातील एक दोन नेते वगळता सर्व नेतेमंडळी यांनी भाजपा सेनेला पाठिंबा दिला होता. तरीदेखील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माण खटाव मधून तेवीस हजाराचे मताधिक्य मिळाले. तर संजय मामा शिंदे यांच्यासोबत माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी 73655 एवढे मतदान दिले. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 96365 मतदान मिळाले. या मतदानामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, भाजपाचे माजी आमदार दिलीपराव येळगावकर, तसेच राष्ट्रवादीला सोडचिट्टी देणारे शेखर गोरे, शिवसेनेचे रणजितसिह देशमुख, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, रासपचे जिल्हाध्यक्ष मामा शेठ विरकर व शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष संजय भोसले एवढे सगळे नेते एकत्र येऊन देखील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठे मताधिक्य देऊ शकले नाहीत.

याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने माण खटाव मधून 73000 च्यावरती मतदान मिळवून दिले. अनेकांनी अचानक राष्ट्रवादीला व कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप सेनेला पाठिंबा दिला मात्र मनात एवढा फरक मतातून पडलेला दिसून आला नाही. दोन-तीन दिवसांपूर्वी माण तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी दहिवडी येथे सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. त्याठिकाणी देखील रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित न राहिल्यामुळे भाजपने एकमेकांना जिलेबी भरवण्यास भाग पडले.

मात्र आमदार जयकुमार गोरे यांच्या सर्व कार्यक्रमाला खासदार नाईक निंबाळकर उपस्थित राहत आहेत. तसेच वाड्या-वस्त्यांना भेट देत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आमदार जयकुमार गोरे व काँग्रेसचे पदाधिकारी दिसून येत आहेत. मात्र भाजपाचा एकही कार्यकर्ता त्यांच्यासमवेत पाहायला मिळत नाही. त्यामुळे खासदार नक्की भाजपाचा ही काँग्रेसचा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे.

फोटो व्हिडिओ सेंड whats app

Conclusion:
Last Updated : May 28, 2019, 10:57 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.