ETV Bharat / state

'पुन्हा लॉकडाऊन करणार असाल तर रोजगाराची रोख भरपाई लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करा'

author img

By

Published : Mar 31, 2021, 3:30 AM IST

पुन्हा लॉकडाऊन करणार असाल, तर बुडणार्‍या रोजगाराची भरपाई सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

congress leader prithviraj chauhan on lockdown
'पुन्हा लॉकडाऊन करणार असाल तर रोजगाराची रोख भरपाई लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करा'

कराड (सातारा) - पुन्हा लॉकडाऊन करणार असाल, तर बुडणार्‍या रोजगाराची भरपाई सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. 2020 मध्ये आढळून आलेल्या रुग्ण संख्येपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी राज्यात सापडत आहेत. विदर्भातील अमरावती आणि नागपूरपासून सुरू झालेली कोरोनाची दुसरी लाट मुंबई-पुण्यासह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनबाबत प्रशासन, वैद्यकीय तज्ञ, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आणि सामान्य जनतेत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. महाराष्ट्रात उद्योजक किंवा वैद्यकीय तज्ञ निडरपणे आपले मत मांडू शकतो, ही आश्वासक बाब असली तरी शासनासमोर पेचप्रसंग आहेत. राज्य पातळीवर लॉकडाऊनची अपरिहार्यता निर्माण झाल्यास अनेक बाबी विचारात घेणे आवश्यक असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण बोलताना...
लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना द्यावी, लॉकडाऊनचा कालावधी कमीत-कमी ठेवावा, बुडणार्‍या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, प्रसंगी आमदार व खासदार स्थानिक विकास निधीचा वापर करावा, खाजगी वाहनातून प्रवासासाठी मुभा द्यावी, शेतमाल तसेच इतर औद्योगिक मालाची वाहतूक सुरू ठेऊन पुरवठा साखळी कायम ठेवावी, लसीकरणाचे प्रमाण वाढवावे, असे चहाण यांनी म्हटलं आहे.

कोणतेही नियोजन न करता केंद्र सरकारने गेल्या वर्षी मार्चमध्ये अचानकपणे लॉकडाऊन केला. त्या निर्णयाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला. भारतातील 3 कोटींहून अधिक लोक दारिद्य्र रेषेखाली ढकलले गेले. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन अर्थव्यवस्थेचे कमीत-कमी नुकसान होईल आणि कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यास मदत ठरेल, अशा प्रकारे लॉकडाउनचे नियोजन करणे आवश्यक असल्याचेही चव्हाण म्हणाले.

हेही वाचा - कराडजवळच्या किल्ले सदाशिवगडावर शिवसृष्टी उभारण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी

हेही वाचा - धाडसाने साप पकडणारी आत्महत्या करेल असं वाटलं नव्हतं -दीपालीची मैत्रिण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.