ETV Bharat / state

शरीरसंबंध ठेवण्यासाठी वहिनीचा दिरावर दबाव; 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल - sister in law physical abuse satara

यात्रेत संशयित आरोपी महिलेला मुलाचा धक्‍का लागला. याच कारणातून संशयित आरोपी महिलेने घरी आल्यानंतर ‘भावोजी, तुम्ही मला जाणून-बुजून धक्‍का मारला, मी तुमच्या दादाला सांगते,’ असे म्हणत दमदाटी केली आणि घाबरलेल्या मुलाला आरोपी महिलेने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले.

city police satara
शहर पोलीस सातारा
author img

By

Published : Mar 12, 2020, 7:25 PM IST

सातारा- शहरातील एका विवाहितेने स्वत:च्या १५ वर्षीय अल्पवयीन मावस दिराला शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचा प्रकार समोर आला आहे. जाणून-बुजून धक्‍का मारल्याचे घरात सांगेन, अशी धमकी देत तिने दिराला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले असल्याचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला. या प्रकरणी विवाहित महिलेविरुद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती देताना शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक भदे

पीडित १५ वर्षीय मुलगा यात्रेनिमित्त आपल्या मावशीच्या गावात आला होता. यात्रेत संशयित आरोपी महिलेला मुलाचा धक्‍का लागला. याच कारणातून संशयित आरोपी महिलेने घरी आल्यानंतर ‘भावोजी, तुम्ही मला जाणून-बुजून धक्‍का मारला, मी तुमच्या दादाला सांगते,’ असे म्हणत दमदाटी केली आणि घाबरलेल्या मुलाला आरोपी महिलेने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. शरीरसंबंध झाल्यानंतर संशयित महिलेने त्याची वाच्यता न करण्याची धमकी दिली. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा संशयित आरोपी महिलेने पीडित मुलाला संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त केले.

या प्रकारामुळे मुलगा आणखी घाबरला. मुलगा कोणाशी काहीच बोलत नसल्याने त्याला त्याच्या मावशीने बोलते केले. त्यानंतर घडलेला धक्कादायक प्रकार पीडित मुलाने आपल्या मावशीला सांगितला. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून मावशीने मुलाला सोबत घेतले आणि शहर पोलीस ठाण्यात जाऊन झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना सांगितली. संशयित आरोपी महिलेविरुद्ध अल्पवयीन मुलाला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केल्या जात आहे.

हेही वाचा- कराड जनता सहकारी बँकेवरील निर्बंधात तीन महिन्यांची वाढ; ठेवीदारांच्या चिंतेत भर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.