ETV Bharat / state

कोयना प्रकल्पातील अनुशेष भरुन प्रश्नांची सोडवणूक करू - शेखर सिंह - अपडेट न्यूज इन सातारा

कोयना धरण, नेहरू उद्यान, कोळकेवाडी टप्पा तीन प्रकल्प, आपत्तकालीन घाट रस्ता, धरण उपकरणे आदी ठिकाणी भेटी देऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी समाधान व्यक्त केले. व्यवस्थापनाकडे अपुरा कर्मचारी वर्ग असतानाही त्यांनी नैसर्गिक व तांत्रिक परिस्थितीवर मात करत आजवर केलेले नियोजन हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Satara
जिल्हाधिकारी शेखर सिंह चर्चा करताना
author img

By

Published : Jun 6, 2020, 3:31 AM IST

सातारा - कोयना धरण व्यवस्थापनाकडे अपुरा कर्मचारी वर्ग असतानाही त्यांनी नैसर्गिक व तांत्रिक परिस्थितीवर मात करत आजवर केलेले नियोजन हे निश्चितच कौतुकास्पद आहे. येथे कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरून काढण्यासोबतच प्रलंबित अन्य प्रश्नांचीही लवकरात लवकर सोडवणूक करण्यासाठी मी निश्चितच प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पाटण तालुका दौरा केला. यावेळी त्यांनी कोयना धरण, नेहरू उद्यान, कोळकेवाडी टप्पा तीन प्रकल्प, आपत्तकालीन घाट रस्ता, धरण उपकरणे आदी ठिकाणी भेटी देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी कोयना सिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, पंचायत समिती गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कोयना व्यवस्थापन उपअभियंता कुंभार, कोळकेवाडी प्रकल्प उपअभियंता भंगाळे आदी अधिकारी उपस्थित होते.

शेखर सिंह यांनी यावेळी कोयना व्यवस्थापन विद्युती, यांत्रिकी, स्थापत्य विभागाची पाहणी केली व मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेतला. याशिवाय पूरपरिस्थिती कशाप्रकारे नियंत्रित केली जाते याचीही माहिती घेतली. कोयना प्रकल्पावरील आधारीत चित्रफित पाहिल्यानंतर धरण निर्मितीनंतर आजपर्यंत ज्या अभियंते, कामगार, यासाठी जमिनी देणारे प्रकल्पग्रस्त यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. धरणाशिवाय या ठिकाणचे कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्चिम घाट प्रकल्प, कोअर व बफर झोन आदीबाबत माहिती घेऊन यातील प्रलंबित प्रश्नाबाबत आपण तातडीने लक्ष घालून हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

संजय डोईफोडे यांनी धरणाची सविस्तर माहिती देताना या ठिकाणचे नियोजन, धरणातून सोडण्यात येणारे सिंचन, पश्चिमेकडील वीजनिर्मिती व पूरकाळातील नियोजन याबाबतची माहिती दिली. पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक थोरात यांनी धरणाची सुरक्षा व्यवस्था, स्थानिक पोलीस यंत्रणा याबाबतची माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.