ETV Bharat / state

सातारा - जावळीत अल्पवयीन मुलीवर दोन वर्गमित्रांचा बलात्कार

author img

By

Published : Jun 20, 2021, 6:40 AM IST

जावळी तालुक्यातील १४ वर्षीय मुलगी शेतात तिच्या कुटुंबीयांसह राहते. तिच्याच वर्गातील दोन मुले या अल्पवयीन मुलीच्या घरी गेले. घरात कोणी नसल्याचे पाहून चाकूचा धाक दाखवत तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. तसेच याचे मोबाईलवर चित्रीकरण देखील केले.

classmates rape minor in Jawali, satara
जावळीत अल्पवयीन मुलीवर दोन वर्गमित्रांचा बलात्कार

सातारा - जावळी तालुक्यातील नववीत शिकत असणाऱ्या मुलीवर चाकूचा धाक दाखवत दोन वर्गमित्रांनी वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती आहे. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

मोबाईलवर केले चित्रीकरण -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावळी तालुक्यातील १४ वर्षीय मुलगी शेतात तिच्या कुटुंबीयांसह राहते. तिच्याच वर्गातील दोन मुले या अल्पवयीन मुलीच्या घरी गेले. घरात कोणी नसल्याचे पाहून चाकूचा धाक दाखवत तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. तसेच याचे मोबाईलवर चित्रीकरण देखील केले. मोबाईलवर केलेल्या चित्रीकरणाच्या आधारे व शेतातल्या घरात कोणीही नसताना याचा कायमस्वरूपी फायदा घेत एक महिना सातत्याने दोन्ही अल्पवयीन मुलांनी वारंवार बलात्कार केल्याचे अल्पवयीन मुलीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

सात महिन्यांची गर्भवती -

पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या पोटात सात महिन्यांचा गर्भ असल्याची खळबळजनक माहिती समोर आली. याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना बालसुधारगृह पाठवण्यात आले. याबाबत संबंधित पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर फिर्यादी व कुटुंबीयांनी पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आणली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, इमरान मेटकरी, पद्मश्री घोरपडे व रफिक शेख यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - खंडाळ्याजवळ अर्धवट जळलेला महिलेचा मृतदेह आढळला

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.