ETV Bharat / state

Student Died In Road Accident : दहावीचा शेवटचा पेपर देवून घरी जाताना अपघात.. विद्यार्थ्याचा मृत्यू - कराडमध्ये अपघात

दहावीचा शेवटचा पेपर देऊन सायकलने घरी जाताना मोटरसायकलने धडक दिल्याने ( Motorcycle hitting bicycle ) अक्षय पांडुरंग शिर्के (वय 16, रा. नांदलापूर, ता. कराड) हा विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू ( Student Died In Road Accident ) झाला. शाळकरी विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्युमुळे शाळेवर शोककळा पसरली आहे.

दहावीचा शेवटचा पेपर देवून घरी जाताना अपघात.. विद्यार्थ्याचा मृत्यू

author img

By

Published : Apr 13, 2022, 9:11 PM IST

कराड (सातारा) - कराड तालुक्यातील नांदलापूर येथील रहिवासी असलेल्या अक्षय पांडुरंग शिर्के या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला. तो दहावीचा शेवटचा पेपर देऊन सायकलने घरी जाताना मोटरसायकलने त्याला धडक दिल्याने ( Motorcycle hitting bicycle ) तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू ( Student Died In Road Accident ) झाला.

विरूध्द बाजूने आलेल्या मोटरसायकलची धडक : दहावीचा शेवटचा पेपर देऊन अक्षय आणि त्याचा मित्र (बुधवार, दि. 6) पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सेवा रस्त्याने सायकलवरून नांदलापूरकडे जात होता. जानव्ही मळा येथे हॉटेल हेस्टी टेस्टीजवळ विरूध्द बाजूने वेगात आलेल्या मोटारसायकलने अक्षयला जोराची धडक दिली. त्यात त्याच्या डोक्याला, छातीला जोरात मार लागला. त्याला तातडीने कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

एकुलत्या एका मुलाचा मृत्यू : अक्षय हा मलकापूरमधील आनंदराव चव्हाण विद्यालयात दहावीमध्ये शिकत होता. शिर्के कुटुंबियांचा तो एकुलता मुलगा होता. त्याच्या मुत्यूमुळे शिर्के कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. तसेच आनंदराव चव्हाण विद्यालयावर शोककळा पसरली. अपघातप्रकरणी मोटारसायकलस्वार अंकुश तुकाराम कारंडे (रा. मलकापूर, ता. कराड) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

हेही वाचा : VIDEO : वाढदिवस साजरा करताना उडाला आगीचा भडका, बर्थडे बॉय सुखरूप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.