ETV Bharat / state

Eknath Shinde Satara Visit सातारा दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री मूळगावी करणार मुक्काम - एकनाथ शिंदे सातारा दौरा

सातारा जिल्ह्यातील दरे (ता. महाबळेश्वर) गावचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे हे राज्याचे ३० वे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्या रूपाने साताऱ्याचा चौथा सुपुत्र मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला आहे. त्यांच्या निवडीमुळे महाबळेश्वर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात चैतन्य निर्माण झाले आहे. ( CM Eknath Shinde Son of Satara District )

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Aug 11, 2022, 10:28 AM IST

सातारा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आपल्या दरे या मूळ गावी येत आहेत. ते आज आणि उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर ( Eknath Shinde Satara visit ) आहेत. गुरूवारी (दि. ११) दुपारी १२ वाजता ते मुंबईतून मोटारीने दरे (ता. महाबळेश्वरकडे) रवाना होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता त्यांचे दरे येथे आगमन होईल. मुंबईतील कार्यक्रम आटोपून साताऱ्याकडे रवाना होणार होणार ( Eknath Shinde Dare village visit ) आहेत.

मुंबईत सकाळी १०.३० वाजता विधानसभा कामकाज सल्लागार समिती बैठक होईल. त्यानंतर सकाळी ११.०० वाजता विधानपरिषद कामकाज सल्लागार समिती बैठक आहे. सकाळी ११.३० वाजता मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा ध्वज प्रदान कार्यक्रम आटोपून दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याकडे रवाना होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता त्यांचे दरे गावी आगमन होईल.

मुख्यमंत्र्यांचा आज दरे गावी मुक्काम मुख्यमंत्री गुरूवारी आपल्या दरे (ता. महाबळेश्वर) या मूळ गावी मुक्कामी आहेत. पावसाळी अधिवेशनापुर्वी ग्रामदैवत आणि कुलदैवताचे ते दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री झाल्याबद्दल दरे ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार ( Eknath Shinde village ) आहे. शुक्रवारी (दि. १२) दुपारी १ वाजता ते दरे येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. सातारा जिल्ह्यातील दरे (ता. महाबळेश्वर) गावचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे हे राज्याचे ३० वे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्या रूपाने साताऱ्याचा चौथा सुपुत्र मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला आहे. त्यांच्या निवडीमुळे महाबळेश्वर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात चैतन्य निर्माण झाले आहे. ( CM Eknath Shinde Son of Satara District )

महाबळेश्वरचे भाग्य उजळले - महाबळेश्वर हा डोंगरी आणि दुर्गम तालुका. कोयना धरण, अभयारण्यामुळे विस्थापित व्हावे लागल्याने कामधंद्यासाठी लोकांना मुंबईची वाट धरावी लागायची. एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय देखील कामधंद्यासाठी ठाण्याला गेले आणि स्थायिक झाले. ९ फेब्रुवारी १९६४ रोजी एकनाथ शिंदे यांचा ठाणे येथे जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे, तर माध्यमिक शिक्षण मंगला हायस्कूलमध्ये झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला होता. सेना-भाजप युती आणि आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये विद खात्यांची मंत्रिपदी त्यांनी भूषवली. त्यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याचा चौथा सुपुत्र मुख्यमंत्री पदावर विराजमान होत आहे. यानिमित्ताने महाबळेश्वर तालुक्याचे भाग्य उजळले आहे.

असा आहे राजकीय प्रवास - एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते असून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. २०१९ च्या सुरुवातीपासून त्यांनी आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (२००९, २०१४ आणि २०१९) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा (२००४) असे चार वेळा आमदार झाले.

हेही वाचा-CM Eknath Shinde : साताऱ्यात जल्लोष; एकनाथ शिंदेंच्या रूपाने चौथा सुपूत्र बनला राज्याचा मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.