ETV Bharat / state

रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून 'पवार शिक्षण संस्था' करा; उदयनराजे भोसलेंचा शरद पवारांना खोचक टोमणा

सर्वसामान्यांची संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेला (Ryat Shikshan Sanstha) 'पवार शिक्षण संस्था' नाव देऊन टाका. अशी उपरोधिक मागणी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje criticizes Sharad pawar) यांनी केली आहे. रयत शिक्षण संस्थेसमोर सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Udayanraje criticizes Sharad pawar
रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून 'पवार शिक्षण संस्था' करा - खा. उदयनराजे
author img

By

Published : Oct 3, 2022, 6:23 PM IST

सातारा: रयत शिक्षण संस्थेला (Ryat Shikshan Sanstha) आमच्या आजीने जागा दिली. त्यावेळी संस्थेचा अध्यक्ष किंवा चेअरमन हा राज्याचा मुख्यमंत्री असावा, असे नियमावलीत होते. परंतु, काहींनी नियमात बदल केला. त्यामुळे सर्वसामान्यांची संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेला 'पवार शिक्षण संस्था' नाव देऊन टाका. अशी उपरोधिक मागणी (Udayanraje criticizes Sharad pawar) खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. रयत शिक्षण संस्थेसमोर सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून 'पवार शिक्षण संस्था' करा - खा. उदयनराजे

काय होता जुना नियम? आमच्या आजीने रयत शिक्षण संस्थेला जागा दिली. त्यावेळी मी लहान होतो. कर्मवीर आण्णा (Karmaveer Bhaurao Patil) आमच्याकडे आले होते. मी त्यांना पाहिले व चर्चाही ऐकली होती. कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी पदसिद्ध अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असावा, असे रयत शिक्षण संस्थेच्या नियमावलीत लिहिले होते. पण नियमावलीत त्यांनी बदल केला. बदल करणारे हे कोण, असा सवाल करत माझे ते माझे आणि दुसऱ्याचेही माझेच अशी पवारांची भूमिका दिसत असल्याची अप्रत्यक्ष टीका उदयनराजेंनी केली.

योगदान नसलेले पदाधिकारी संस्थेत ज्यांचे काहीही योगदान नाही. अशा लोकांना पवारांनी संस्थेवर घेतले असल्याचा आरोप करून उदयनराजे म्हणाले की, संस्थेवर मला घेऊ नका. माझी तशी मागणीही नाही. आम्ही संस्थेला खूप काही दिलं आहे. पण त्यांनी काय दिलं? फक्त ओढलंय. संस्थेवर घेताना पवारांचे योगदान बघणे गरजेचे होते. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून टाका. ज्यांची संख्या जास्त त्यांचे नाव द्या. संख्या कोणाची जास्त आहे. त्याप्रमाणे लागू करा. माझ्या आईचे माहेरचे नावही पवार असल्याचे ते म्हणाले.

कर्मवीरांच्या वारसांनी लक्ष द्यावे- उदयनराजे जे लोक आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या वेदना ऐकून घ्यायला कोणी तयार नाही. अण्णांचा वारसा सांगणाऱ्या वारसांनी आंदोलनकर्त्यांच्या मागणीसाठी थोडा तरी आवाज उठवावा, अशी मागणी खा. उदयनराजेंनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.