ETV Bharat / state

'उदयनराजेंच्या दहशतीला घाबरुन शरद पवारांनी त्यांना लोकसभेची दिली उमेदवारी'

सातारा लोकसभा मतदारसंघात गुप्त सर्वे करण्यात आला.  त्यामध्ये उदयनराजे तुम्हाला आवडतात का ? असे विचारले तर नाही म्हणून उत्तर आल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

author img

By

Published : Apr 13, 2019, 2:31 AM IST

Updated : Apr 13, 2019, 7:33 AM IST

चंद्रकांत पाटील

सातारा - शरद पवार यांनी उदयनराजे यांच्या दहशतीला घाबरुन त्यांना उमेदवारी दिल्याचे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पवारांनी मनापासून उदयनराजे यांना लोकसभेची उमेदवारी दिली नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व त्यांचे उमेदवार उदयनराजे या दोघांवरही निशाणा साधला. शिवसेना-भाजपच्या महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील

सातारा लोकसभेच्या मतदारसंघात गुप्त सर्वे करण्यात आला. त्यामध्ये उदयनराजे तुम्हाला आवडतात का ? असे विचारले तर नाही म्हणून उत्तर आले. पण खुला सर्वे केला असता त्यांच्या दहशतीमुळे नागरिक हात वर करतात. उदयनराजेंची एवढी दहशत आहे की, कोणीही हात वर करणार नाही. शरद पवारही त्यांना घाबरले आहेत. अशा माणसाला हरवायचे असेल तर गुप्त मतदानाची जागृती करायला हवी. ही जागृती दोन ते तीन लाख लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, असा त्यांनी राजकीय फॉर्म्युला सांगितला. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील उपस्थित होते.

Intro:सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना एक खळबळजनक वक्तव्य केल्यामुळे मोठी चर्चा निर्माण झाली आहे. "शरद पवार ही उदयनराजे यांच्या दहशतीला घाबरून त्यांनी उमेदवारी दिली आहे. असे वक्तव्य त्यांनी सातार येथे केले आहे.

Body:या मतदारसंघात गुप्त सर्वे करायचा ठरला त्यामध्ये उदयनराजे तुम्हाला आवडतात का..? तर नाही म्हणून उत्तर आलं, पण ओपन सर्वे केला असता त्यांच्या दहशतीमुळे नागरिक हात वर करतात. उदयनराजेंची एवढी दहशत आहे की, कोणीही हात वर करणार नाही. शरद पवार हि घाबरले आहेत. त्यांनी मनापासून उमेदवारी उदयनराजे यांना दिलेली नाही.

अशा माणसाला हरवायचा असेल तर लोकांना गुप्त मतदान आहे. याची जागृती करून, दोन ते तीन लाख लोकांपर्यंत पोहोचल पाहिजे. असे चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवले आहे. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र पाटील उपस्थित होते.

video send by whatsapp

Conclusion:
Last Updated : Apr 13, 2019, 7:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.